तळा(किशोर पितळे) गेली कित्येक वर्षांपासून रखडलेला तळा शहराचा पाणी प्रश्न अखेर मार्गी लागले असून तळा शहरात पाणी पुरवठा योजना राबविण्यास सार्वजनिक बांधकाम व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी मिळाली आहे.गेलीकित्येक वर्षे तळा शहराला पाण्याची समस्या भेडसावत होती. पाण्याच्या कमतरतेमुळे शहरातील शिक्षक, बँक कर्मचारी, तहसील कर्मचारी यांसारखे सुशिक्षित वर्ग इंदापूर, माणगाव व रोहा शहरात स्थलांतरित झाले आहेत.तसेच मार्च ते पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत शहरातील महिलांना पाणी टंचाईमुळे दूर विहिरींवरून पाणी आणावे लागत आहे.याबाबत गेल्या चार वर्षांपासून तळा नगरपंचायतीकडून शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.तसेच पाणी टंचाईची गंभीर समस्या आमदार भरत गोगावले यांना सांगितली असता आमदार गोगावले यांनी स्वतः सार्वजनिक बांधकाम व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान अंतर्गत तळा पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी मंजुरी दिली आहे.याप्रसंगी आमदार भरत गोगावले, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, तालुका प्रमुख प्रध्रुम्न ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके,गटनेते अँड.चेतन चव्हाण, नमित पांढरकामे, लीलाधर खातू, सिराज खाचे, विठोबा चांडीवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तळा शहराचा पाणी प्रश्न अखेर मार्गी लागणार ; पाणीपुरवठा योजनेला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी.
Admin Team
0
Post a Comment