म्हसळा आरडीसी बँकेत विविध सहकारी संस्थांचा 67 वा "सहकार सप्ताह" संपन्न



म्हसळा : प्रतिनिधी

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचा ६७ वा "सहकार सप्ताह" म्हसळा येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यालयात संपन्न झाला. सदर कार्यक्रमास जेष्ठ माजी संचालक श्रीपत धोकटे,संचालक संतोष पाटील,संचालक तुकाराम महाडीक,विनायकराव गीजे, संस्थाचे अन्य चेअरमन,सदस्य आणि सचिव उपस्थित होते. यावेळी सहाय्यक निबंधक श्री वाघमारे आणि उपस्थित संचालकांनी नव्याने सर्वच संस्था सक्षमीकरण करण्याबाबतीत अनमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँक निरीक्षक लिलाधर रिकामे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा