तळा (किशोर पितळे) तळा तालुक्यात प्रतिष्ठित समजली जाणाऱ्या चरईखुर्द ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत चरई गवळवाडीचे सुपुत्र दिनेश गायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दिनांक 10/11/20 रोजी चरईखुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवडणुक घेण्यात आली. या ग्रामपंचायतीचे सरपंचयांच्या अध्यक्षतेखालीउपसरपंच निवडणुक पार पडली या निवडणुकीत दिनेश गायकर यांनी उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले त्या विरोधात कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणुक बिनविरोध झाली.दुपारी दोनच्या सत्रानंतर दिनेश गायकर यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर करण्यात आले. दिनेश गायकर यांनी चरईखुर्द ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेऊन विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.गावाचा विकास हाच आमचा ध्यास "असून शासकीय योजनांचा लाभ तळा गाळापर्यत मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे मत नवनिर्वाचित उपसरपंच दिनेश गायकर यांनी व्यक्त करून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
Post a Comment