आदिवासी बांधवांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांची अनोखी दिवाळी भेट!




किरण शिंदे / लोणेरे

शिक्षक ग्रुप गोरेगाव तर्फे अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. शिक्षक हा समाजाचा एक  घटक असल्याने समाजातील गोरगरीब-वंचित घटकांसाठी पुढे केलेला हात नक्कीच प्रेम आणि आशीर्वाद देऊन जातो. जागतिक कोरोना महामारी आणि निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीची दिवाळी साजरी करत असताना, शिक्षक ग्रुप गोरेगावच्या वतीने दि.१५ नोव्हेंबर २०२० रोजी गोरेगाव विभागातील आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांसोबत यावर्षी दिवाळी सण साजरा करण्यात आला. मिठाईचा पुडा, वापरण्यायोग्य  कपडे आणि विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य या स्वरूपात वाटप करून, गोरेगाव परिसरातील कुशेडे, मढेगाव आणि पन्हळघर बुद्रुक आदिवासी वाड्यांवरील १५० आदिवासी बांधवांसोबत दिवाळी सण साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी माजी सभापती आदरणीय श्री. रामभाऊ म्हसकर साहेब, कुशेडे ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीम. मोरे मॅडम, पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री.रामभाऊ भोस्तेकर उपस्थित होते.
"यंदाची दिवाळी, आदिवासी बांधवांसोबत"
या कार्यक्रमासाठी श्री.सुधाकर करकरे, श्री. संदीप साळवी, श्री. संजय पाटोळे, श्री. रविंद्र पालकर, श्री .गणेश खामकर, श्री.गिरीधर कुथे, श्री. सुजित भोजने, श्री. परेश अंधेरे,श्री. मुकेश भोस्तेकर, श्री. प्रशांत जंगम, श्री.सुरेंद्र मनवे, सौ.साधना करकरे, श्री.जितेंद्र बोडके, श्री. चंद्रकांत भोजने, श्री. शैलेश लोखंडे, सौ. गायत्री भोईर, सौ.निलिमा खरात, श्रीम.रत्नमाला बेरे, श्री.गजानन ताम्हाणे, श्री.मारुती आगरे , श्री.गणेश बांगर, श्री.उदय गायकवाड, श्री.सुनिल गोरेगावकर, श्री.मदन वानखेडे, श्री.राज कडू, श्री.संजय खैरे आदी.शिक्षक बंधू-भगिनींनी आर्थिक, कपड्यांच्या स्वरुपात आणि लेखन साहित्याच्या स्वरुपात मोलाचे योगदान दिले.
सामाजिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या "शिक्षक ग्रुप गोरेगावचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे!.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा