अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत
(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा तालुक्यामध्ये दिनांक ०१/०१/२०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे . कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे .
१. एकत्रीकृत प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्दी, दि .१६ नोव्हेंबर , २०२०(सोमवार)
२. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी, दि .१६ नोव्हेंबर २०२० (सोमवार) ते दि .१५ डीसेंबर २०२० ( मंगळवार )
३.विशेष मोहिमांचा कालावधी, दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दोन शनिवार आणि रविवार .
४. दावे व हरकती निकालात काढणे दि . ०५ जानेवारी , २०२१ (मंगळवार) पर्यंत
५. प्रारूप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दी करिता आयोगाची परवानगी घेणे, दि .१४ जानेवारी २०२१ (गुरुवार) पर्यंत
६. डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई इत्यादी दि . १४ जानेवारी , २०२१ (गुरुवार)
७. अंतिम मतदार यादी प्रसिध्दी दि . १५ जानेवारी , २०२१ ( शुक्रवार )
तालुक्यातील रहिवाश्यांना दि १६ नोव्हेबर ,२०२० ते दि .१५डीसेंबर ,२०२० या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे योग्य तो फॉर्म - नमुना नोंदविणेकामी आवाहन करणेत येत आहे .
१ ) फॉर्म - नमूना नं . ६ - नव्याने मतदार नोंदणी करणे
२ ) फॉर्म - नमूना नं . ७ - मयत मतदार , कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार यांचे मतदार यादीतील नाव वगळणे कामी
३ ) फॉर्म - नमूना नं . ८ - मतदार यादीतील नावांची किंवा तपशीलाची दुरुस्ती करणेकरिता
४ ) फॉर्म - नमूना नं . ८ अ - मतदार संघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणीकरिता
दि .०१ जानेवारी , २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने नाव नोंदणी करणेचे शिल्लक असल्यास अशा नवतरुण मतदारांना मा.भारत निवडणूक आयोग , यांनी पुन्हा संधी दिली आहे.त्यामुळे अशा मतदारांनी तसेच इतर काही मतदार आहेत ज्यांची नावातील दुरुस्ती कायमस्वरुपी स्थानात बदल मयत मतदार असे अर्ज संबंधित तहसिलदार कार्यालय , उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांनी नियुक्त केलेल्या ठिकाणी सादर करता येतील .
मतदार यादया पुनरिक्षण कार्यक्रमाकामी म्हसळे तालुक्यातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करणे बाबत तहसीलदार शरद गोसावी यांनी आज एका बैठकीद्वारे आवाहन केले आहे
Post a Comment