मिलिंद जाधव यु.एस.ए.च्या पुरस्काराने सन्मानीत ; कळसूबाई शिखराच्या मोहीमेत स्तुत्य सहभाग
Team Mhasla Live
दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचीत्य साधत सोलापूरमधील '३६०एक्सप्लोरर' या संस्थेच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्वात उंच साडेपाच हजार फूट उंचीच्या कळसूबाई शिखराची मोहीम आयोजित केली होती.यावेळी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या सुमारे साठ लोकांच्या उपस्थितीत शिखराच्या सर्वोच्च माथ्यावर भारतीय राज्यघटनेचं सामूहिक वाचन करण्याचा एक अनोखा उपक्रम संपन्न झाला.
जगातल्या पाच खंडांमधील सर्वोच्च शिखरं सर करणारे आनंद बनसोडे आणि लातूर येथील आंतरराष्ट्रीय धावपटू ओमकार स्वामी यांचा सहभाग हे या सोहळ्याचं ठळक वैशिष्ट्य होतं.
समता,अखंडता आणि स्वातंत्र्याचा संदेश देण्याबरोबरच समाजभान आणि पर्यावरणाच्या नियमाचं काटेकोर पालन करत संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्याची हाय "रेंज बुक आॕफ वर्ल्ड रेकॉर्ड"मधे नोंद करण्यात आली.
गडदुर्गांच्या वेगवेगळ्या धाडसी मोहीमेत सक्रिय सहभाग घेणारे रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावचे दुर्गप्रेमी मिलिंद मधुकर जाधव यांनीही या मोहीमेत सहभाग घेतला होता.त्यांना ३६० एक्सप्लोरर या संस्थेच्या सन्मानपत्राबरोबरच राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणाऱ्या या सोहळ्याची हाय रेंज बुक आॕफ वर्ल्ड रेकॉर्डमधे नोंद झाल्याने भारत सरकारची मान्यता असलेलं आणि अमेरिकेने (USA) प्रमाणित केलेलं आणखी एक विशेष सन्मानपत्र आणि पदक देऊन सन्मानीत करण्यात आलं.ज्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो त्या व्यक्तींचा "हाय रेंज पर्सन"असा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. दुर्गप्रेमी मिलिंद जाधव यांना हा महत्वपूर्ण मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचं सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
मात्र कोरोना महामारीच्या टाळेबंदीमुळे त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाचं पदक आणि सन्मानपत्र मिळण्यासाठी सात महीन्यांचा अवधी लागला.
Post a Comment