म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
तीन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा नाझीमा मुकादम यांनी म्हसळा नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक ९ आणि वार्ड क्रमांक १४ मध्ये पाणी आणि स्वच्छतेसाठी आमरण उपोषण सुरू केले होते परंतु गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच मागण्या पूर्ण केल्याचे नगराध्यक्षा जयश्री कापरे आणि उपनगराध्यक्ष सुहेब हालडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की नगरपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्याने उपोषणाचे नाटक करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असून अशा खोट्या प्रचाराला नागरिकांनी बळी न पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. विकासात्मक दृष्टया राज्यमंत्री तथा पालकमंत्री नाम.आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे हे लक्ष ठेऊन वेळोवेळी नगरपंचायतीसाठी फार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत. नगर पंचायतीतील उपनगराध्यक्ष सुहेब हालडे, गटनेते संजय कर्णिक आणि माझे सर्व सहकारी यांचे काम उत्कृष्ट आणि समाधानकारक असून वेळोवेळी त्यांची सहकाऱ्याची भूमिका असल्याचेही जयश्री कापरे यांनी सांगितले. तालुक्यात इतर ठिकाणी पाण्याची टंचाई असतानाही शहरामध्ये आम्ही कधीही पाणी टंचाई भासू दिली नाही असे सांगून नगर पंचायतीने एका अनधिकृत बांधकामाला भोगवटा प्रमाणपत्र नाकारल्याने हे उपोषण नाट्य रचले आहे असे मत कापरे यांनी यावेळी व्यक्त केले. वार्ड क्रमांक ९ आणि १४ मधील प्रत्येक समस्या वारंवार सोडविताना आम्ही कोणत्याही आणि कसल्याही प्रकारचा आकस मनात आणला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
नाझीमा मुकादम यांच्या मागण्यांपैकी इदगा टाकीजवळील पाण्याच्या टाकीवर जाळीचे झाकण, तारेचे कम्पाऊंड आणि बेलदारवाडीत लिफ्टिंग चे पाणी पुरविण्यात येत असल्याचे सांगून म्हसळा बायपासच्या रस्त्याचे काम सुरु असल्याने आणि कोविड मुळे थोडेफार अडचणींना सामोरे जावे लागत असून काही दिवसात हाही प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पाभरे लाईनचे काम ९५% पूर्ण झाले असून बायपासच्या वरील बाजूस ३० हजार लिटर क्षमतेच्या टाकीचे काम येत्या १० ते १५ दिवसात पूर्ण होईल आणि पाण्याच्या बाबतीतील सर्व समस्या दूर होतील असे सांगून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही नगराध्यक्षा जयश्री कापरे यांनी केले आहे.
अद्याप काम झाले नाही, नगर पंचायत खोटे विधान देत आहे.
ReplyDeletePost a Comment