रत्नागिरी-रायगडला जोडणार्या आंबेत पुलला बँ.अंतुलेंचा नाव द्या:आंबेत ग्रामपंचायतीची मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे मागणी
म्हसळा(निकेश कोकचा)
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मेहरूम बँ.ए.आर.अंतुले यांचे नाव रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांला जोडणार्या आंबेत पुलावर मोठी कमान उभारून देण्यात यावे व गावामध्ये नवीन रस्ते मंजूर करावेत अशी मागणी महसूल राज्य मंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याकडे आंबेत ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
गुरवारी राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार आंबेत-म्हापरळ जेटीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले असताना ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी सरपंच अफरोजा डावरे,उप सरपंच पांडुरंग आंबेकर,अबरार आमिन यांच्या सहित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री मेहरूम बँ.अंतुले यांचा म्हसळा तालुक्यातील आंबेत हा गाव असून,या गावामध्येच रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबेत पूल आहे.
Post a Comment