रोहा (वार्ताहर)
पोएट मी नॉट लिव ह्या हॅश टॅग खाली आंतराष्ट्रीय स्तरावरील प्रतिभासंपन्न कवी, कवयत्रिंकडुन काव्य श्रुंखलेसाठी त्याच्या इंग्रजी अनुवादासह कवितांचे ऑनलाईन संमेलनासारखा एक आगळावेगळा उपक्रम सध्या साहित्यक्षेत्रात खुप लोकप्रिय ठरत असून रोह्यातील प्रतिभासंपन्न कवयत्री सौ. मानसी चेतन चापेकर यांचा या आंतरराष्ट्रीय काव्यश्रुंखलेत सहभाग असून त्यांच्या कवितांना चोखंदळ वाचकांकडून खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या मॅरेथॉनमधील कवितांचे भाषांतर रशियाच्या अल्मानॅकमध्ये केले जाईल असे आयोजकांकडुन सांगण्यात आले असून मुळ मराठी कविता आणि तिचा इंग्रजी अनुवाद असा हा उपक्रम आहे.
या उपक्रमांतर्गत आठ दिवस आठ कविता व सोबत आपला फोटो पाठवायचा असून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रोह्यातील सौ.मानसी चापेकर यांच्या साहित्याचे या उपक्रमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत असून त्यांच्या प्रतिभेचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे.
या उपक्रमासाठी सौ. मानसी चापेकर यांना पवई मुंबई येथील साहित्यिक श्री. चिंतामणी जोगळेकर यांचे विशेष सहकार्य लाभत असून त्यांच्या मराठीतील कवितांचे इंग्रजी अनुवाद करण्याचे काम श्री. जोगळेकर करीत आहेत.
या आंतरराष्ट्रीय काव्य श्रुंखलेसाठी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रभा सोनावणे यांनी मानसी चापेकर यांना मानांकित केले असून त्या संधीचे सोने करत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या साहित्य प्रतिभेची चुणूक दाखवली आहे.
येत्या 24 तारखेला नवरात्रोत्सव निमित्त होणाऱ्या आदाब अर्ज या नामांकित मुशायऱ्यात देखील सौ. मानसी चापेकर यांचा सहभाग असणार आहे.
Post a Comment