रोहा (निखिल दाते)
रोटरी क्लब रोहा, लायन्स क्लब रोहा, गुजराथी समाज रोहा, जैन संघ रोहा,सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे रोह्यात ओसवाल भवन येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.
सदर शिबिरात 74 बाटल्या रक्त संकलित करण्यात आल्याची माहीती रोटरी क्लब रोहा अध्यक्ष आशिष शहा यांनी दिली.
शिबिर यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब रोहा अध्यक्ष आशिष शहा, सेक्रेटरी स्वप्नील धनावडे, एएजी विक्रम जैन,पास्ट प्रेसिडेंट सतीश महाडिक,राजीव शहा,लायन्स क्लब रोहा अध्यक्ष श्री. कीर्तीशेठ, उपाध्यक्ष नुरुद्दीन रोहावाला,सेक्रेटरी पराग फुकणे,गुजराथी समाज अध्यक्ष मिलन शहा, जैन समाज अध्यक्ष दिलीप सोलंकी, सुराज्य सामजिक प्रतिष्ठान अध्यक्ष रोशन चाफेकर व या संघटनांच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment