तळा (किशोर पितळे)
तळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नमीत पांढरकामे यांचे पिताश्री मनोहर विष्णु पांढरकामे यांचे २६ आँक्टोंबर २०रोजी पहाटे चार वा.अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले.मृत्यू समयी ७१वर्षाचे होते.पश्चात पत्नी,दोन मुलगे सुना,मुलगी जावई नातवंडेअसा परिवारआहे.विद्यमाननगरसेविका नेहा पांढरकामे यांचे सासरे होत.कै.मनोहर पांढरकामे यांनी एस् टी महामंडळात चालक म्हणून ३०वर्ष सेवा करून सेवा निवृत्ती घेतली होती.इंदापूर व तळा नामदेव शिंपी समाजात सामाजिक कार्यात नेहमी कार्यरत असत. निर्गवी,स्मितहास्य,सुस्वभावी मीत भाषी गोरे असेव्यक्तीमत्व होतेसामाजिकबांंधिलकीतून समाजातील व ईतर समाजातील वधु वरांची लग्न जमवून देतअसत. हे विधायक कार्य करीत असताना भाग्यवान समाधान व्यक्त करीत असत.राधाकृष्ण मंदिर बांधकाम कमिटीचे सदस्य होते.सर्वांच्या सुख दुखाःत नेहमी सहभागी होत असत.सामाजीक कार्यात हिरीरीने भाग घेत असत.कै.पाढंरकामे यांच्या निधनाची बातमी समजताच समाजबांधव मित्रमंडळी,नातेवाईक हितचिंतक, ग्रामस्थ यांनी अंत्यसंस्कार वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याचे दशवीधी कार्य ४नोव्हेंबर व उत्तर कार्य (तेरावे) ६नोव्हेंबर रोजी तळा मुक्कामी होणार आहे.असे कळविले आहे.
Post a Comment