निसर्ग चक्रीवादळात पडलेल्या भोस्ते आदीवासी वाडीतील १६ घरे वनवासी कल्याण आश्रम व प्रतिबिंब चॅरीटेबल ट्रस्टने दिली बांधून


निसर्ग चक्रीवादळात पडलेल्या भोस्ते आदीवासी वाडीतील १६ घरे वनवासी कल्याण आश्रम व प्रतिबिंब चॅरीटेबल ट्रस्टने दिली बांधून
हस्तांतरण समारंभ होणार रविवार दिनांक 1नोव्हेंबर 2020 रोजी
संजय खांबेटे : म्हसळा 
तीन जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळाचा संपूर्ण रायगड जिल्ह्याला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला. जिल्ह्यातील जनजाति बांधवांच्या वाड्या व स्त्यांचे अतोनात नुकसान झाले .श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते आदिवासी वाडीतील 16 घरांचे पुनर्वसन वनवासी कल्याण आश्रम,महाराष्ट्र व प्रतिबिंब चारीटेबल ट्रस्ट अंधेरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले, घरांचे पुनर्वसन कार्य पूर्ण झाले असून त्या वास्तूंचे हस्तांतरण समारंभ रविवार दिनांक1नोव्हेंबर 2020 रोजी (युगाब्ध्द 51 22 शालिवाहन शके 1942 अश्विन मा.कृष्ण प्रतिपदा ) दुपारी ११ वा.करण्याचे योजिले आहे.सदर उपक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी परमपूज्य वाघुले महाराज (नारंगी-रायगड) यांची उपस्थित रहाणार आहे,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती ताई पवार, अध्यक्ष वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र भूषविणार आहेत, नरेश पडिया (प्रतिबिंब चारीटेबल ट्रस्ट अंधेरी) व अखील भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे सोमया जुलुज उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण मानकर, महेश देशपांडे ,श्रीधर कोचरेकर, मुकुंद चितळे,भिवा पवार, श्रीमती पी.ललिता हे मान्यवर येणार आहेत .या प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आयोजकानी कळविले आहे.
वनवासी कल्याण आश्रम संपूर्ण हींदूस्थानातील विविध प्रांतातआदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, वैद्यकीय सेवा पुरवणे- मानव आणि पशू, वसतीगृहे आणि शाळांमध्ये शैक्षणिक मार्गदर्शन.करते.शहरी भागात मदत तसेच वैद्यकीय बाबतीत मदत, शहरात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मदत, सरकारीकामांत सहाय्य.आज देशभरात १३१४ एकल विद्यालये कार्यरत आहेत. सोबतच महाराष्ट्रात सरकारी आश्रमशाळा देखील वनवासी कल्याण आश्रम वनवासी कल्याण आश्रम ग्रामविकास या संकल्प नेवरही काम करत आहे. शेतीचे आधुनिक तंत्र, सिंचनाच्या नवनव्या कल्पना, शेतीपूरक उद्योग आणि वनव्यवस्थापन यामध्ये विविध प्रकल्प सूर आहेत.वनवासी कल्याण आश्रम देशातील दऱ्या-खोऱ्यात राहणाऱ्या  शेवटच्या आदिवासी समाजासाठी कार्य करते, या सर्वांमुळे श्रीवर्धन मधील भोस्ते येथील घरकुल हस्तांतरणाला विशेष गर्दी होणार आहे.
फोटो . निर्सग वादळांत पडलेली व नवीन बांधून हस्तांतरणास सज्ज असलेली टुमदार घरे छाया चित्रांत दिसत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा