किरण शिंदे लोणेरे
माणगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या उपसभापती पदी शिवसेनेचे महेंद्र तेटगुरे यांची 28 आक्टोबर रोजी बिनविरोध निवड झाली.
माणगाव तालुक्यात महाविकास आघाडी चा धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेस ने शिवसेनेला पाठिंबा देत एकत्रित पणे हि निवडणूक पारपाडत महेंद्र तेटगुरे यांची माणगाव तालुका पंचायत समितीच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली या पुढे महाविकास आघाडी च्या माध्यमातून एकत्रित पणे माणगाव तालुक्यात काम करणारं असून तळागाळातील लोकांच्या समस्या चे निवारण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू असे नवनिर्वाचित उपसभापती महेंद्र तेटगुरे यांनी सांगितले याआधि महेंद्र तेटगुरे यांनी सभापती पदाचा कामकाज अत्यंत उत्तम रित्या सांभाळले आहे. यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, माजी सभापती सुजीत शिंदे, माजी उपसभापती राजेश पानकर , अनेक सरपंच,उपसरपंच,विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, मोठ्या संख्येने शिवसैनिक व हितचिंतक उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचित उपसभापती महेंद्र तेटगुरे यांना शुभेच्छा दिल्या.
Post a Comment