चोरट्याना पकडायचे आव्हान शिल्लक
( म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा -माणगाव - पुणे या राष्ट्रीय मार्गावर देवघर नजिक लॉक डाऊनमध्ये बंद असलेल्या विचारे फॅमीली रेस्टॉरंट वर दरोडेखोरानी शुक्रवार दि ९ ऑक्टो रोजी घरफोडी करून हॉटेल मधील रु ६० हजार किमतीचे दोन फ्रिज चोरल्याची घटना घडली . म्हसळा पोलीसानी सदरच्या गुन्ह्याची नोंद तब्बल ९ दिवसानी १६ऑक्टो २०२०गु.र.नं ५३ ./२० भादवि ४५४,४५७ ,३८० प्रमाणे नोंदवून तंपास सुरु केला म्हसळा पोलसांच्या दहशतीमुळे चोरटे पुरते भांबाहून गेले शनी.दि.२४चे मध्यरात्री किंवा पहाटे अखेर चोरट्यानी विचारे फॅमीली रेस्टॉरंटचे सॅमसंग कंपनीचा ४०० लीटरचा फ्रिज व Blue Star कंपनीचा३००लीटरचा कोल्ड स्टोअरेज फ्रीज विचारे यांचे हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या शांताराम शिंदे यांचे शेतात ठेवले असल्याचे आढळले.विचारे यानी पोलीस सूत्रांजवळ संर्पक साधला असता घटनास्थळी पोलीस जाऊन मुद्देमालाची खात्री करून मुद्देमाल स्थानिक पंचासमोर ताब्यात दिल्याची घटना घडली.
"सदरचे फ्रिज चोरट्यानी रस्त्यापासून १५० मीटर आत शेतांत अचलून सुस्थितीत ठेवले होते,पीकअप ने आणल्याच्या खुणा दिसत होत्या , घटनास्थळी पिकअपची मड फ्लॅप सुद्धा पडली आसल्याने खरे चोरटे पोलीसांच्या हाती लागावे "
सुनिल विचारे, मालक,विचारे फॅमीली रेस्टॉरंट
" दरोडयाच्या पार्श्वभूमीवर चोरटे मुद्देमाल घरपोच करत असताना आता चोरट्यांच्या मुसक्या आवळणे म्हसळा पोलिसाना पुढे छोटे आवाहन आहे त्याना आमच्या शुभेच्छा आहेत"
कृष्णा कोबनाक
भारतीय जनता पक्ष,महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य
Post a Comment