म्हसळा शहर काँग्रेस (आय)च्या अध्यक्षा नाझिमा मुकादम उद्यापासून आमरण उपोषण करणार.


म्हसळा शहर काँग्रेस (आय)च्या अध्यक्षा नाझिमा मुकादम उद्यापासून आमरण उपोषण करणार.
पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी मुकादम करणार उपोषण
(म्हसळा प्रतिनिधी)
मसाला नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 9 व वार्ड क्रमांक 14 मध्ये नगरपंचायत मार्फत होणारा पाणीपुरवठा हा सतत अपुरा मनमानी व दूषित पद्धतीने होत असते, याच परिसरात असणारी साठवणीच्या पाण्याची टाकी ही प्रचंड अस्वच्छ असते यामध्ये नगरपंचायतीने तात्काळ सुधारणा करून त्या भागातील गोरगरीब नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व रोजच्या रोज स्वच्छता व्हावी या मागणीसाठी काँग्रेस(आय) च्या महिला अध्यक्षा श्रीमती नाझिमा मुकादम या गेले काही दिवस प्रशासना कडे पाठपुरावा करत असून म्हसळा नगरपंचायत मुकादम यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्या सोमवार दिनांक 26 ऑक्टोबरपासून सकाळी १०वा. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी अमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी आमचे प्रतिनिधीला सांगितले.
इदगा परिसरातील वॉर्ड नंबर 14 मध्ये गेले काही महिने पावसाळ्यात सुद्धा पाणी पुरवठा योग्य तऱ्हेने होत नव्हता. पाणी भरण्यासाठी नागरिकांना रस्त्यापासून खोल, निसरड्या मार्गावरून जावे लागते, वार्ड क्रमांक 9 मध्ये असणारे पिण्याचे पाण्याच्या टाकी भोवती कुत्रे -मांजरांचा वावर असतो तेच पाणी नागरिकांना प्यावे लागते याबाबत सुद्धा अनेक वेळा तक्रारी करून नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे किरकोळ मागण्यांसाठी उपोषण करावे लागते हे येथील नागरिकांचे दुर्दैव आसल्याचे मुकादम यानी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा