तळा (किशोरपितळे)
विजया दशमी(दसरा)शुभ मुहूर्तावर सकाळी ११.३०वा. पांढरे क्लिनिक चे उद्घाटन माजी जि.प.सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती माधुरी रोडे यांच्याशुभ हस्ते फीत कापून पुजन करून करण्यातआले तर जेष्ठ डॉ.सतिश वडके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
डॉ. विकास पांढरे तालुक्यातील ग्रामीण भागातील पन्हेळी(गायमुख)येथील रहिवासी असून प्रतिकूल
परिस्थितीवर मात करून प्राथमिक शिक्षण गायमुख व तळा येथे सायन्सचे शिक्षण वेदक महाविद्यालयात
घेऊन पुढील वैद्यकीय शिक्षण मुंबई येथे घेतले.
BHMS,CCH,MD(Alternative medicin)
शिक्षण पूर्ण झाल्यावर माझ्या गावी ग्रामीण भागातील जनतेची सेवा करण्याचा निर्णय घेतला.दोन वर्ष स्थिरावल्यावर तळा शहरात प्रँक्टीस करण्यासाठी क्लिनिकचे उद्घाटन केले." गावाकडे चला,गावाचा विकास तो देशाचा विकास,"हा महात्मा गांधींच्या संदेशाचा अवलंब करून मोठ्या शहरात स्थीर होण्यापेक्षा तालुक्याचा विकासात भर घातली आहे.
हा युवा पिढी पुढे आदर्श ठेवला आहे.यावेळी किशोर पितळे, पुरूषोत्तम मुळे कृष्णा भोसले,राजू सप्रे, चंद्रकांत रोडे यांनी उद्घाटन पर पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रम प्रसंगी डॉ.विचारे, डॉ.रहाटविलकर,डॉ.कोटीया,मेडिकलचे राजू सप्रे, सुर्यकांत (राघू) रोडे दिपक कोटीया तसेच पत्रकार किशोर पितळे,पुरूषोत्तम मुळे,कृष्णा भोसले,प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामस्थ,हितचिंतक उपस्थित होते.
Post a Comment