रायगड पोलिस कवायत मैदान येथे पोलीस स्मृतिदिन समारंभ संपन्न


शहीद पोलिसांना जिल्हाधिकारी निधी चाैधरी आणि पोलिस अधीक्षक अशाेक दुधे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण

टीम म्हसळा लाईव्ह
देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना आज जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड पोलीस कवायत मैदान येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
     यानिमित्ताने पोलिस स्मृतिदिन संचलन समारंभ देखील पार पडला. प्रारंभी  जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.
     यावेळी  जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, रोहा पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, अलिबाग पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम, संचलन प्रमुख राखीव पोलीस निरीक्षक भास्कर शेंडे व पोलीस दलातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
     याप्रसंगी आपल्या संदेशात  जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी विविध पोलिस दलांमधील २६ पोलिस अधिकारी आणि २४० पोलिस अंमलदारांना आपले कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झाल्याबद्धल श्रद्धांजली वाहिली व या वीरश्रेष्ठांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा