पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा; तळा बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी तहसीलदारांना निवेदन.
तळा(किशोरपितळे)
राज्यात गेल्या आठवड्यात परतीच्या जोरदार पावसामुळे शेती घरे-झोपडी गोठे व मृत जनावरे यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश शासनानाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दि.१६ ऑक्टोबर रोजीच्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशान्वे परतीच्या पावसामुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात प्रत्यक्ष पाहणी करुन तातडीने पुर्ण करण्याचे आदेश काढण्यात आले असून बळीराजा शेतकरी संघटना तळा यांनी मा.तहसीलदार तळा निवेदन दिलेअसून आर्थिक मदत मिळावी.अशी मागणी निवेदनात केली आहे.तसेच तळा तालुका कृषी विभाग अधिकारी यांना मंडल अधिकारी सागर वाडकर यांच्याकडे निवेदन सादर केले.यावेळी अध्यक्ष भास्कर गोळे यांनी सांगितले कि लाँकडाऊन पच्या काळात चाकरमानी मुंबई सारख्या शहरात तछन कामधंदा सोडून आले असून शेती करण्याचा अनेकांनी निर्णय घेतला आणी शेती केली पिक उत्तम आले आहे पण निसर्गाच्या लहरीपणामुळे मेहनत वाया गेली आहे.तरी शासनाने अधिकाधिक आर्थिक मदत करावी अशी प्रतिक्रिया प्रतिनिधी व्यक्त केली यावेळी भास्कर गोळे, ज्ञानेश्वर भोईर,केतन वाजे किरण चव्हाण, राजू थिटेकर,राजीव भोरावकर केशव हिरवे वगैरे शेतकरी उपस्थित होते.
Post a Comment