म्हसळा शहर काँग्रेस (आय)च्या अध्यक्षा नाझिमा मुकादम व आरती पेडणेकर यांच्या उपोषणाला यश


म्हसळा शहर काँग्रेस (आय)च्या अध्यक्षा नाझिमा मुकादम व आरती पेडणेकर यांच्या उपोषणाला यश
शिवसेना, शेतकरी कामकरी पक्ष, वंचीत बहुजन अधाडीचा पाठींबा
(म्हसळा प्रतिनिधी)
मसाला नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 9 व वार्ड क्रमांक 14 मध्ये नगरपंचायत मार्फत होणारा पाणीपुरवठा हा सतत अपुरा मनमानी,अनियमीतत व दूषित पद्धतीने होत असतो, याच परिसरात असणारी साठवणीच्या पाण्याची टाकी ही प्रचंड अस्वच्छ असते यामध्ये नगरपंचायतीने तात्काळ सुधारणा करून त्या भागातील गोरगरीब नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व रोजच्या रोज स्वच्छता व्हावी या मागणीसाठी काँग्रेस(आय) च्या महिला अध्यक्षा श्रीमती नाझिमा मुकादम, आरती पेडणेकर यानी आज नगरपंचायत प्रशासना विरुद्ध तहसील कार्यालया समोर उपोषण केले. याना बशीर युनूस भुरे,अध्यक्ष श्रीवर्धन विधानसभा कॉंग्रेस (आय),डॉ.मुईज शेख म्हसळा तालुका कॉंग्रेस (आय), रफी घरटकर,बाबा हुर्जुक, सुफीयान हळदे, बाबासाहेब, सिद्दीका करदेकर, शमीम फजल काजी, जुलेखा करदेकर, सायरा पठाण व नवानगर परिसरां तील कार्यकर्तांचा पाठींबा होता.
इदगा परिसरातील वॉर्ड नंबर14 मध्ये गेले काही महिने पावसाळ्यात सुद्धा पाणी पुरवठा योग्य तऱ्हेने होत नव्हता. पाणी भरण्यासाठी नागरिकांना रस्त्यापासून खोल, निसरड्या मार्गावरून जावे लागते, वार्ड क्रमांक 9 मध्ये असणारे पिण्याचे पाण्याच्या टाकी भोवती कुत्रे -मांजरांचा वावर असतो तेच पाणी नागरिकांना प्यावे लागते याबाबत सुद्धा अनेक वेळा तक्रारी करून नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे किरकोळ मागण्यांसाठी उपोषण करावे लागते हे येथील नागरिकांचे दुर्दैव आसल्याचे नझमा मुकादम यानी सांगितले. उपोषणाला शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के, शेतकरी कामकरी पक्षाचे मा.तालुका चिटणीस परशुराम मांदाडकर व बहुजन वंचीत आघाडीचे पदाधिकारी यानी पाठींबा दिला.
"म्हसळा शहर काँग्रेस(आय) च्या महिला अध्यक्षा श्रीमती नाझिमा मुकादम व आरती पेडणेकर या वॉर्ड क्रं ९व१४ च्या पाणी व स्वच्छतेसाठी करीत आसल्या नगरपंचायत प्रशासनानी संपूर्ण म्हसळा शहरासाठी केला आहे, या आंदोलनाला माझा केवळ पाठींबा नसून जरूर. वाटल्यास मी तुमच्या समवेत लढेन , मी प्रशासनाला धारेवर धरेन असे शिर्के यानी उपोषण कर्ताना अश्वासन दिले"
नगरपंचायत प्रशासनाने दोनही वॉर्ड मध्ये आलेल्या समस्या व यावर केलेल्या उपाय योजनांचे लेखी पत्र व उपोषण कर्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन यो उपचार केल्याने उपोषण स्थगीत केल्याचे जाहीर करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा