परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या.


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह

म्हसळा तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने भात शेती चे नुकसान केले असून त्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी या करिता आज भारतीय जनता पार्टी म्हसळा तालुका यांच्या वतीने तालुका अध्यक्ष मा. श्री. प्रकाश रायकर यांच्या नेतृत्वाखाली मा. तालुका कृषी अधिकारी यांना निवदेन देण्यात आले. यावेळी तालुका सरचिटणीस श्री. महेश पाटील, तालुका उपाध्यक्ष श्री.समीर धनसे. उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा