तळा(किशोरपितळे) महावितरण कंपनीने दर मंगळवारी सकाळी ९ते सायंकाळी ६ पर्यंत वीज शट डाऊन केल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. हा शट डाऊनरविवारी घेतलाजावाअशीतळातालुक्यातील जनतेची मागणी जोर धरू लागली आहे.या दिवशी सर्व शासकीय कार्यालये,बँकाआठवडा सुट्टी असल्याने बंद असतात.त्यांमुळे जनता कामासाठी येत नाही. इतर वारी शट डाऊन घेत असल्याने बँकेचे व्यवहार बंद पडतात.ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना वेळ व पैसा खर्च होतो.व पुर्ण दिवस वाया जातो.दर मंगळवारी शट डाऊन घेऊनही नंतर देखील
लाईट वारंवार जात असते.त्यामुळे पाणी पुरवठा वितरणावर मोठा परिणाम होतो.वारंवार लाईट जात असल्याने वीज उपकरणे,वीजेवर चालणारे उद्योग घंदे बंद होतात.२०आँक्टोबंर रोजी ऊद्या कांदळगांव वपाबरे येथे ११०केव्ही उच्च दाब लाईन वर काम व देखभाल साठी विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे.त्यामुळे संपूर्ण तळा, म्हसला व माणगांव या तालुक्यात शटडाऊनचा त्रास सहन करावालागत आहे
तरी महावीज वितरण कंपनीने मंगळवार ऐवजी रविवारी शट डाऊन घ्यावाअशीतालुक्यातीलजनतेची मागणी आहे.
Post a Comment