नैसर्गिक आपत्तीत विरोधकांकडून होणार राजकारण दुर्दैवी. - सुनील तटकरे खासदार रायगड


नैसर्गिक आपत्तीत  विरोधकांकडून होणार राजकारण दुर्दैवी.... सुनील तटकरे खासदार रायगड

 श्रीवर्धन व म्हसळ्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे 

 श्रीवर्धन : संतोष सापते 

 आज संपूर्ण देश नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात आहे. महाराष्ट्रात महा विकास आघाडीच्या माध्यमातून विद्यमान राज्य सरकार अतिशय चांगले काम करत आहे. मात्र दुर्दैवाने विरोधक नैसर्गिक आपत्तीत सुद्धा राजकारण साधत आहेत ही बाब दुःखद आहे असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले. श्रीवर्धन मधील नगरपरिषद शाळा नंबर एक  मध्ये श्रीवर्धन तालुका कार्यकर्ता मेळाव्याच्या प्रसंगी सुनील तटकरे बोलत होते . श्रीवर्धन म्हसळा या दोन्ही तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. 2011साली श्रीवर्धन मध्ये प्रथमता नगर परिषदेवर ती सत्ता मिळविण्यात राष्ट्रवादी-काँग्रेस यशस्वी झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा वारू पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये संचारला आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मला  अतिशय अल्प  मताने पराभव स्वीकारावा लागला मात्र 2019 ला संपूर्ण रायगड जिल्ह्यातील मतदारांनी मला भरघोस मत देऊन विजयी केले. लोकसभेनंतर विधानसभेमध्ये विद्यमान पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या वरती मतांचा पाऊस पाडण्यात आला. श्रीवर्धन मधील जनतेने माझ्यावर ते दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवणार आहेच त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी त्याला सक्षम करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. गेल्यास सरकार ने प्रचार यंत्रणा राबवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंबहुना काँग्रेस या दोन्ही पक्षांना विरोधी नेतेपद सुद्धा मिळणार नाही अशी वल्गना केली होती. विरोधी पक्षनेते पद हे बहुजन आघाडीला मिळेल असे तत्कालीन मुख्यमंत्री म्हटले होते. मात्र शरद पवार यांच्या जादूने भाजपला विरोधी बाकावर बसवण्यात भाग पाडले. आजमितीस विद्यमान राज्य सरकार कोरोना  व चक्रीवादळ या दोन्ही नैसर्गिक आपत्तींला समर्थपणे सामोरे जात असताना भाजपकडून चुकीच्या पद्धतीचे राजकारण केले जात आहे. सर्वसामान्य घटकाच्या आरोग्याचा प्रश्न विचारात घेऊन विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण विचारांशी आज पर्यंत मंदिर बंद ठेवले आहेत मात्र विरोधक घंटानाद करून मंदिर सुरू करण्याविषयी आग्रही आहेत. भाजप करत असलेलं राजकारण हे पूर्णतः चुकीचे असून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणार आहे. असे सुनील तटकरे यांनी सांगितले तटकरे पुढे म्हणाले रायगड जिल्हा सर्व क्षेत्रामध्ये अग्रणी राहण्याच्या दृष्टिकोनातून मी माझा पक्ष सदैव प्रयत्नशील आहे. रायगड मधील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण  धोरणात्मक निर्णय घेत भक्कम अशी पावले उचलली आहेत आगामी काळात रायगड जिल्ह्यातील पर्यटन हे वृद्धीगंत झाल्याचे आपल्याला दिसून येईल. श्रीवर्धन म्हसळा माणगाव तळा अलिबाग याठिकाणी चक्रीवादळाने अक्षरशः थैमान घातलं चक्रीवादळाच्या दिवशी सबंध रात्रभर मी झोपू शकलो नाही.  डोळ्यांमधून  अश्रूच्या धारा वाहत होत्या माझा सर्वसामान्य रायगड कर चक्रीवादळाच्या फेऱ्यांमध्ये अडकला होता हे दुःख पचवून मी, पालकमंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व  कार्यकर्ते संपूर्ण शक्तीनिशी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलो. जनतेला जास्तीत जास्त मदत निधी कसा उपलब्ध करून देण्यात येईल या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केले व त्यामध्ये मी यशस्वी  झालो. असे सुनील तटकरे यांनी सांगितले. कार्यकर्ता मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे,  जिल्हा युवती  अध्यक्ष सायली दळवी श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, रायगड जिल्ह्यातील विविध भागांचे प्रमुख व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा