हरवित प्राथमिक शाळेला शालेय साहीत्य वाटप ; सह्याद्री अकादमीचे एक पाऊल शिक्षणाकडे
मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी श्रीवर्धन यांच्यावतीने एक पाऊल शिक्षणाकडे या उपक्रमाअंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील हरवीत येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील ईयत्ता पहीली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना बुधवार दि.२८ ऑक्टोबर २०२० रोजी शारीरीक अंतराचे योग्य ते पालन करुन स्वाध्याय पुस्तके तसेच विवीध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न करीत आहोत.सह्याद्री विद्यार्थी अकादमी गेली चार वर्षांपासून संपुर्ण महाराष्ट्रभर गरजु विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी हा उपक्रम राबवीत आहे.मुलांच्या चेहऱ्यावर साहित्य मिळाल्यानंतर दिसणारा आनंद हीच आमच्या कामाची पावती असल्याची भावना अकादमीच्या सदस्यांनी यावेळी व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ललिता पवार,सदस्य शितल पवार,दिघी केंद्रप्रमुख गोविंद खरगावकर सर,मुख्याध्यापक जनार्दन जाधव सर,मनोज गावित सर,तसेच सहयाद्री विद्यार्थी अकादमीचे प्रयोग किर,ऐश्वर्य विलणकर,सर्वेश विलणकर,स्नेहल विलणकर,दिव्या विलणकर,सोहम विलणकर,श्रीतेज नांदविडकर,मनिष मोरे हे उपस्थित होते.यावेळी सहयाद्री विद्यार्थी अकादमीला सहकार्य करणाऱ्या सर्व सहकार्यांचे संस्थेचे सदस्य प्रयोग किर यांनी विशेष आभार मानले
Post a Comment