म्हसळा पोलीसानी दाखविला कर्तव्य दक्षपणा : सर्वदूर होत आहे कौतुक .

फोटो - कॉस्टेबल संदीप रामचंद्र फोंडे आणि आरोपीसह म्हसळा पोलीस

संजय खांबेटे : म्हसळा 
पोलीसांची समय सूचकतेचे व निष्काळजी पणाची प्रसीद्धी माध्यमे सतत लक्ष करीत असतानाच.पोलिसांची समय सूचकतेने साई चेक नाक्यावर चोरीचे स्कूटर जप्त केल्याची नुकतीच घटना घडली त्यावेळी कर्तव्यावर असलेले म्हसळा पोलीस स्टेशनचे कॉस्टेबल संदीप रामचंद्र फोंडे यांचे तालुक्यात कौतुक होत आहे. सदरचा गुन्हा म्हसळा पोलीसानी गु.र.नं ५५/र०२० मुंबई पोलीस अधिनियम 1951 इतर मुंबई पोलीस अधिनियम 1951प्रमाणे गुन्हा नोंदविला असून अंकुश यशवंत गोमाणे वय २४ या युवकाला ताब्यात घेतले आहे .मुंबई येथील अश्वीन शहा यांचे मालकीची काळ्या रंगाची Acces स्कूटर MHOI DG1534चोरून तो म्हसळाकडे येत असता दिं.२४ रोजीचे पहाटे ३ वा.साई चेकनाका (म्हसळा) येथे नाका बंदी करीत असता त्याची चोरी पोलीसानी ऊघड केली. गुन्ह्याचा तपास पो.ह.संदीप चव्हाण करीत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा