रोहा (निखिल दाते)
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोहे तालुक्यातील दसबा फाऊंडेशन तर्फे श्री. महेश बामुगडे व श्री. रूपेश बामुगडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 'पावलांवर पाऊल' या भव्य उपक्रम सोहळ्यात रायगडचे खासदार श्री. सुनील तटकरे यांच्या हस्ते रोह्यातीलच नव्हे तर रायगड मधील लोकप्रिय युवा संघटना असलेल्या सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानला सर्वोत्कृष्ट सामाजिक मंडळ/संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले.
राष्ट्रपती पुरस्कारासह विविध सन्मानाने गौरविलेल्या निवड समितीने निवड चाचणीत सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानची निवड या पुरस्कारासाठी केली ही बाब टीम सुराज्य साठी अभिमानास्पद होती.
श्रीवर्धन मतदारसंघातील सर्व तालुक्यांतील सामाजिक संस्थाचा सन्मान यावेळी केला व प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट टीम अवॉर्ड यावेळी देण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना सुराज्यचे संस्थापक अध्यक्ष व युथ आयकॉन रोशन चाफेकर,सदस्य हाजी कोठारी, मयूर धनावडे, विनीत वाकडे, सौरभ भगत हे उपस्थित होते.
या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.
सर्व संस्थांच्या कार्याची चित्रफीत या वेळी दाखवण्यात आली.यावेळी उपस्थित सर्वच संस्थांचा सन्मान करण्यात आला. मात्र तालुक्यातील सर्वोत्कृष्ट मंडळांचा विशेष सन्मान यावेळी केला.
सदर पुरस्कारासाठी सुराज्यची निवड केल्याबद्दल निवड समितीचे व उपक्रमाचे दर्जेदार नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे सुराज्यने विशेष आभार मानले.
खासदार सुनील तटकरे यांनी सुराज्यचे कौतुक करत असताना सांगितले की सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे कार्य मी मागील काळात अनेक माध्यमातून बघत होतो.अनेकवेळा सुराज्य समाजातील भावना विविध पद्धतीने मांडत असते.भविष्यात चांगल्या कार्यासाठी त्यांनी सुराज्यला शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमासाठी आ.अनिकेतभाई तटकरे, तालुक्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव पाटील,विजयराव मोरे,विनोदभाऊ पाशीलकर,रोहाचे उपनगराध्यक्ष श्री.महेश कोल्हटकर,गटनेते मयुर दिवेकर, जिल्हा शांतता समिती सदस्य आप्पा देशमुख यांसह सर्व सामाजिक संस्था यांची उपस्थिती होती.
Post a Comment