म्हसळयात कोवीड केअर सेंटरला सुरवात : प्रेस क्लबच्या मागणीला यश


म्हसळयात कोवीड केअर सेंटरला सुरवात : प्रेस क्लबच्या मागणीला यश 
ग्रामिण रुग्णालयासाठी कायमस्वरूपी वैद्यकिय अधिक्षकाची मागणी प्रेस क्लब लावून धरणार.

संजय खांबेटे : म्हसळा 

म्हसळा तालुक्यात सशक्त आरोग्य यंत्रणा, कोवीड केअर सेंटरला सुरवात करावी व आरोग्य यंत्रणेत विविध सुधारणा व्हाव्या म्हणून प्रेस क्लब पाठपुरावा करीत असतानाच खासदार सुनिल तटकरे व पालकमंत्री आदीती तटकरे यानी विशेष व सकारात्मक समन्वय साधल्याने रवीवार दि.१८ ऑक्टोबर पासून म्हसळा (वरवठणे) आय.टी.आयमध्ये४० खाटांचे कोवीड केअर सेंटरला सुरवात झाली आसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी गणेश कांबळे यानी सांगितले. म्हसळा तालुक्यात नैसर्गिक वातावरण चांगले आसल्याने कोवीड रुग्ण संख्या फार कमी आहे.तालुक्यातील जनता गरीब आसल्याने कोवीड रुग्णांची सोय स्थानिक पातळीवर व्हावी हा प्रश्न प्रेस क्लबने लावून धरला व त्याला यश आले.
म्हसळा येथील C.C.C.साठी वैद्यकीय अधिकारी २,स्टाफनर्स २,लॅब टेक्नीशीअन१, औषध निर्माता १,डाटा एंट्री ऑपरेटर १, सफाई कामगार २ अशी पदे मंजूर व कार्यरत आहेत या सेंटरमध्ये कोरोना+ , कोरोना संशयित रुग्णाना कॉरेंटाईन करण्यासाठी किंवा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना संशयित म्हणून कोव्हीड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येईल,एकत्र कुटुंब व्यवस्था असून प्रत्येक कुटुंबात किंवा घरात 10-12 व्यक्ती एकत्रित राहतात प्रत्येक घरामध्ये एकच मर्यादीत स्वच्छतागृह असल्याने एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाबाधा झाल्यावर त्याच घरामध्ये विलगीकरण करणे शक्य होत नाही अशा रुग्णाना या सेंटर मध्ये ठेवले जाणार आहे.

प्रेस क्लबची पुढील मागणी ग्रामिण रुग्णालयाला कायम स्वरूपी वैद्यकिय अधिक्षक मिळावा
रुग्णालय सुरू होऊन दहा वर्ष झाली तरी रुग्णालयाला कायमस्वरूपी वैद्यकिय अधिक्षक नाही, प्रभारी अधीक्षकांकडे जसवली, श्रीवर्धन व म्हसळा या तीन रुग्णालयाचा कारभार आहे. त्यामुळे अपुलकीने लक्ष देता येत नाही,म्हणून रुग्णालयांत कामांच्या अनेक त्रुटी रहातात, अनेक वेळा शासनाकडून होणाऱ्या इमारत दुरुस्त्या व अन्य साधन सामुग्री बंद अवस्थेतील अगर आलेलीच साधन सामुग्री नादुरुस्त स्थितीत असते,निर्सग वादळानंतर दुरुस्त केलेले ग्रामिण रुगणालयाचे काम सदोष काम आसल्याने आजही गळत आहे.

" म्हसळ्यात कोवीड केअर सेंटर सुरू झाले असतानाच दुसरे बाजूने म्हसळा तालुक्यातील कोवीड रुग्णांचे प्रमाण कमी आहे. आजचा बाधीत केवळ १रुग्ण , ७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, आजपर्यंत एकूण बाधीत रुग्ण ३२० आहेत , तर३०० रुग्ग्णानी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, बरे होण्याचे प्रमाण ९४ % आहे. तर १३ रुग्ण मृत आहेत.म्हसळयात कोवीड केअर सेंटरला सुरवात झाल्याने म्हसळयाची आरोग्य व्यवस्था सशक्त होणार आहे."
डॉ. गणेश कांबळे , तालुका आरोग्य अधिकारी , म्हसळा

                    फोटोः कोवीड केअर सेंटर

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा