म्हसळा शहरात पाणी समस्या बाबतीत भारतीय जनता पार्टी कडून मुख्याधिकारी यांना निवेदन.
टीम म्हसळा लाईव्ह
गेली अनेक वर्षे म्हसळा शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे म्हणून पाभरे नदीतून अतिरिक्त नळपाणी पुरवठा योजना सन २००९- १० मध्ये मंजूर केली सदरच्या कामांचे 2 वेळा भूमिपूजने करण्यात आली मात्र ती आज पर्यंत अपूर्ण अवस्थेत आहेत. या योजनेचा आज ही काम अर्धवट आहे. सदरचे काम लवकरच पुर्ण करावे या करिता तालुका अध्यक्ष श्री प्रकाश रायकर यांच्या नेतृत्वाखाली मा. मुख्याधिकारी, नगरपंचायत म्हसळा यांना निवेदन देण्यात आले आहे सोबत तालुका सरचिटणीस श्री.महेश पाटील, तालुका उपाध्यक्ष श्री.दुर्जनसिंग राजपूत, तालुका चिटणीस श्री. मनोहर जाधव, तालुका उपाध्यक्ष युवा श्री.जितेंद्र नाक्ति इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment