रोहा (निखिल दाते)
रोह्याची साहित्य पंढरी असलेल्या व शतकोत्तर यशस्वी वाटचाल करणाऱ्या भाटे सार्वजनिक वाचनालयात शनिवारी शारदोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.
या वर्षी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून असलेल्या सर्व प्रचलित नियमांचे पालन करत हा उत्सव वाचनालयातर्फे साजरा करण्यात येणार आहे.
या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले नाही पण रक्तदान शिबिर व अन्य आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करुन भाटे सार्वजनिक वाचनालयाने आदर्श घालून दिला आहे.
शनिवारी सकाळी आठ वाजता अध्यक्ष किशोर रविंद्र तावडे यांच्या हस्ते शारदा पूजन करण्यात आले. यावेळी सौ. अपुर्वा महेश कुलकर्णी, स. ग्रंथपाल सौ.रश्मी राजेश खराडे, लिपिक सौ. श्रुती सावंत, सहाय्यक श्री. चेतन पिसाट आदी उपस्थित होते, कोरोनाच्या पाश्वभूमीवर अगदी मोजके पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शारदा पूजनाचा सोहळा संपन्न झाला.वे. मु. श्री. अविनाशराव जोशी यांनी पौरोहित्य केले.
यावेळी कोरोनामुक्तीसाठी सरस्वतीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
Post a Comment