कोरोनायोद्धा कै यतीन भागवत यांच्या कुटूंबाना मिळाली महावितरण कंपनी कडून तातडीची मदत


महावितरण गोरेगाव चे कर्मचारी कोरोनायोद्धा कै यतीन भागवत यांच्या कुटूंबाना मिळाली महावितरण कंपनी कडून  तातडीची मदत 

राम भोस्तेकर माणगाव


रायगड जिल्ह्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव विभागातातील महावितरणचे कर्मचारी कै. यतिन विठोबा भागवत, व.तंत्रज्ञ म्हणून काम करत होते कोरोना सारख्या महाभयंकर आजारात सुद्धा ते ग्रामीण भागात जनतेची कामे करत होते खरतर यतीन भागवत हे सर्वांन मध्ये सुपरिचित होते परंतु त्यांना सुद्धा कोरोना आजाराची लागण होऊन ते दि.03/09/2020  रोजी कोविड-19 च्या आजाराने त्यांचे  दु:खद निधन झाले. महावितरण कंपनीमध्ये कोविड -19 च्या आजाराने मृत्यू झाल्यास तिस लाख रुपये सानुग्रह सहाय्य देण्याची तरतूद असल्याने महावितरण कंपनी तर्फे मंजूर झालेल्या तीस लाख रुपयांचा धनादेश कोरोना योध्दा म्हणून मिळणीरी रक्कम रूपये तीस लाख कार्यकारी अभियंता खांडेकर , आणि सहकारी आधीकारी धाईंजे, वाकोडे यांचे अथक प्रयत्नामुळे​ कै.भागवत यांच्या कुटुंबीयांना सदर रक्कम अल्पावधीतच देण्यात आली म्हणून माजी कर्मचारी  रमेश गोविलकर भारतीय मजदूर संध, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, विश्र्वास वर्तक  कार्यवाह,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रायगड रविर्न्द दानवे, खजीनदार भारतीय मजदूर संध रायगड.यांज कडून खांडेकर , धाईंजे, वाकोडे,सौ.पेंडसे, भागवत, जांबरे आणि वाकडे यांचा विशेष  गौरव करून सत्कार करण्यात व कै.भागवत यांच्या पत्नी श्रीमती योजना भागवत यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन, गोरेगांव विभागाचे कार्यकारी अभियंता,  खांडेकर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी गोरेगांव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता  बोराडे , उप व्यवस्थापक (वि व ले), धाईंजे साहेब, प्रभारी उप व्यवस्थापक (मासं) वाकोडे ,तुषार वाकडे, जांबरे,  हावरे हे कर्मचारी  उपस्थित होते. .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा