म्हसळा तालुक्यासाठी महाविकास आघाडीच निधी देणार


शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत इमारती व अन्य झालेल्या नुकसानी बाबत मुख्यमंत्री व पालकमंत्री आदीती तटकरेंची भेट घेणार: महादेव पाटील

म्हसळा तालुक्यासाठी महाविकास आघाडीच निधी देणार
( म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे सर्वांत जास्त शासकीय मालमत्तेचे नुकसान फार मोठया प्रमाणात झाले आहे. त्यामध्ये प्राथमिक शाळा ,माध्यमिक हायस्कूल ,अंगणवाड्या , ग्रामपंचायत इमारती, स्मशान शेड, समाजमंदिर,सार्वजनिक शौचालय,खासगी शाळा व अन्य ग्रामपंचायत मालमत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे व त्या बाबत शासनाकडे अहवाल गेला आहे त्याबाबत मी लौकरच पालकमंत्री मा.आदीतीताई तटकरे व खासदार सुनील तटकरेंची भेट घेणार असल्याचे म्हसळा तालुका शिवसेना प्रमुख तथा माजी सभापती महादेव पाटील यानी सांगितले.
तालुक्यातील या सर्व इमारतीना सुमारे रु १२ कोटी २७ लक्ष निधी लागणार आहे. त्यामध्ये १०२ प्राथमिक शाळाना रु ३ कोटी ४५ हजार, ८१ अंगणवाडी इमारतीना १ कोटी ६५ हजार, ग्रामपंचायत, समाज मंदीर स्मशानशेड व अन्य याना सुमारे रु ७ कोटी ३० लक्ष निधीची आवश्यकता लागणार आहे. राज्य शासनात असणाऱ्या रायगडच्या पालक मंत्री आदीती ताई तटकरे,खासदार सुनील तटकरे व विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे ही श्रीवर्धन मतदार संघाचे विकास कामांचा व मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या धोरणाचा योग्य तऱ्हेने प्रचार व प्रसार करीत आसल्याचे सांगितले.

तालुक्यांत निर्सगचक्रीवादळा मुळे झालेल्या नुकसानीत मा. मुख्यमंत्री महोदयानी रायगड जिल्ह्याला मोठया प्रमाणात निधी दिल्यामुळे तालुक्याती नुकसान ग्रस्त व्ययक्तीक लाभार्थी शेतकरी ,फळबागायतदार याना बऱ्यापैकी थोडी बहुत नुकसान भरपाई मिळाली आता प्रश्न आहे तालुक्यातील प्राथमिक शाळा ,माध्यमिक हायस्कूल ,अंगणवाड्या , ग्रामपंचायत इमारती, स्मशान शेड, समाजमंदिर या बाबत मी मुख्यमंत्री व पालक मंत्र्यांची भेट घेणार आसल्याचे तालुका प्रमुख पाटील यानी सांगितले .

"राज्य शासनाकडून शाळा दुरुस्तीसाठी निधी भरघोस मिळावा यासाठी ते पत्रकारांजवळ वार्तालाप करीतहोते .निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यातील अनेक शाळांचे छप्पर उडाले असुन काही शाळा जमीनदोस्त झाल्या आहेत मात्र जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळानंतर तातडीने शाळांवर छप्पर टाकण्यासाठी निधी देण्यात आला नाही. ऑगस्ट -सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळांच्या भिंती भिजून तसेच वर्ग खोल्यांमध्ये पाणी साचून शाळा व अंगणवाडी वर्गखोल्या अधिकच धोकादायक झाल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा व अंगणवाडी यांचे फेर पंचनामे करून राज्य शासनाने शाळा दुरुस्ती व अंगणवाडी दुरुस्तीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी पाठपुरावा करणार आहे "
महादेव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा