किरण शिंदे/ लोणेरे
माणगाव तालुक्यातील लोणेरे गोरेगाव भागातील कापण्यायोग्य झालेली भातशेती परतीच्या पावसाने भात अडवे पडून पाण्यात चार चार दिवस बुडून पुर्णपणे कुजून गेले आहे तसेच गुरांसाठी लागणारे वैरण ( पेंडा) ही फुकट गेला आहे.
लोणेरे गोरेगाव विभागातील शेतकरी राजाच्या या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी कुणबी युवा मंचाने माणगाव तहसीलदार अहिरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. त्यावेळी कुणबी युवा मंचाचे अध्यक्ष वैभव टेंबे, उपाध्यक्ष सुधाकर करकरे आणि प्रविण म्हसकर तसेच मनिष खाडे, मंगेश म्हसकर, अजिंक्य करकरे, विशाल टेंबे रमेश मोरे व प्रवीण टेंबे आदी उपस्थित होते.
Post a Comment