आ. अनिकेत तटकररेंनी घेतली रोहा महावितरण विरोधातील तक्रारींची दखल


आ. अनिकेत तटकरे यांनी घेतली महावितरण रोहा आधिकाऱ्यांची शाळा ; रोहेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी दिला एक महिन्याचा अल्टिमेटम

रोहा (वार्ताहर)

रोह्यातील महावितरणच्या ढिसाळ आणि नियोजनशुन्य कारभारामुळे रोहेकर त्रस्त झालेले असून सातत्याने होणारा विजेचा लपंडाव,सातत्याने कमी जास्त होणारा विद्युतदाब,भरमसाट येणारी विद्युत देयके, महावितरणचा कायम बंद असणारा दुरध्वनी,महावितरण कार्यालयात तक्रार घेवून जाणाऱ्या नागरिकांना मिळणारी उडवाउडवीची उत्तरे या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता शासकीय विश्रामग्रूह रोहा येथे रोहेकर नागरिक व महावितरण आधिकारी यांना समोरासमोर आणून महावितरण रोहा आधिकारी व अभियंत्यांची चांगलीच शाळा घेतली.
रोहेकरांच्या महावितरण संबंधीच्या सर्व समस्या येत्या महिनाभरात सुटल्याच पाहिजेत असे सांगून त्यांनी महिन्याचा अल्टिमेटम महावितरण रोहा आधिकाऱ्यांना दिल्या. महिनाभरात या समस्या सुटल्या नाहीत तर आपण वरिष्ठ पातळीवर लेखी तक्रार करू असा सज्जड ईशाराही त्यांनी आधिकाऱ्यांना दिला.
उपस्थित रोहेकरांनी या वेळी आपल्या अनेक समस्या मांडल्या. भरमसाठ आलेल्या अनेक विद्युत देयकांसंबंधीच्या तक्रारी लक्षात घेता या समस्या सोडवण्यासाठी येत्या मंगळवारी 27 ऑक्टोबर रोजी रोहे शहरातील नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे विशेष शिबिर घ्यावे अशी सुचना आ. अनिकेत तटकरे यांनी केली. ग्रामीण भागात देखील प्रत्येक विभागवार अशा शिबिरांचे आयोजन व्हावे असेही त्यांनी सुचवले.
सदर बैठकीला आ. अनिकेत तटकरे यांच्यासमवेत रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, नगरसेवक महेंद्र गुजर, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर अध्यक्ष अमित उकडे,माजी नगरसेवक पत्रकार अल्ताफभाई चोरडेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पार्टे,निखिल दाते,युवा कार्यकर्ते रविंद्र चाळके, मयुर पायगुडे, निलेश शिर्के, अभिजित पाशिलकर,किरण मोरे,तालुक्यातील पदाधिकारी अनंतराव देशमुख, मयुर खैरे, तानाजी जाधव, रोहे शहरातील राजेश खराडे,राकेश कागडा,हेमंत शेठ, विजय जोशी,शितलचंद्र देशपांडे, आदींसह रोहे शहर व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
निखिल दाते यांनी उपस्थित रोहेकर नागरिकांच्या वतीने रोहेकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयात जातीने लक्ष घालून आधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्याबद्दल आ. अनिकेत तटकरेंचे आभार व्यक्त केले.
एक महिन्यानंतर या समस्यांसंबंधी पुन्हा आढावा घेण्याच्या सुचना आ. अनिकेत तटकरेंनी या वेळी दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा