ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याला खा. सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांची भेट.


ऐतिहासिक  कुलाबा किल्ल्याला खासदार  सुनील तटकरे व  रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री  आदिती तटकरे यांची भेट.

 राम भोस्तेकर : माणगाव

भारतीय पुरातत्व विभागाच आधिपत्य असलेल्या अलिबाग येथील कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराचे मुख्यालय असणाऱ्या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळते आहे. किल्ल्यात सर्वत्र झुडपे पसरली आहे. किल्लातील पाणी  दुषित झाले आहे. गणेश मंदिरासमोरील दिपस्तंभ पडण्याची शक्यता आहे. किल्ल्यावरील जुन्या तोफांची दुरवस्था होते आहे. त्यामुळे किल्ल्याची तातडीने देखभाल दुरुस्तीचे काम सुरु करण्यात यावे अशी मागणी शिवप्रेमी संघटना आणि अलिबागकरांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर काल  किल्ल्याची पहाणी करण्यात आली. यावेळी माझ्यासह, खासदार मा श्री.सुनील तटकरे, जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. किरण पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष मा.श्री.प्रशांत नाईक, आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी मा.श्री.रुघुवेंद्र यादव तसेच जिल्ह्यातील अन्य शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करावे अशा सुचना त्यांनी यावेळी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. किल्ला संवर्धनासाठीचा बृहद आराखडा तयार करून तो केंद्र सरकारकडे पाठविला जावा, त्यासाठी राज्यसरकारच्या वतीने जी काही मदत लागेल ती दिली जाईल, निधीची कमतरता असल्यास तो राज्यसरकारकडून उपलब्ध करून देता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. किल्ल्यात दरवर्षी माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवासाठी लाखो भाविक किल्ल्यात येतात त्यामुळे पुरातत्व विभाग भाविकांकडून प्रवेश शुल्क आकारत असते. या दिवशी भाविकांकडून प्रवेश शुल्क आकरण्यात येऊ नये अशी सूचना त्यांनी केली.
अलिबाग मधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची किल्ल्यात गाइड म्हणून नियुक्ती करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या पर्यटन विभागा मार्फत करता येऊ शकेल. त्यामुळे किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना किल्ल्याची माहितीही मिळेल आणि स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगीतले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा