महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राला सुविधा देणार-आरोग्य मंत्री राजेश टोपे.आरोग्य केंद्राचे ऑनलाईन उदघाटन.
तळा (किशोरपितळे)कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्यावर विविध प्रकारच्या उपाययोजना जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दुर्गम डोंगराळ भाग असलेल्या तळा तालुक्यातील महागाव येथे आज २ ऑक्टोबर रोजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र महागावचे ऑनलाईनउदघाटन करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा पाालकमंत्री ना.अदिती तटकरे, राजिप अध्यक्षा योगिता पारधी, विधान परिषद आ.अनिकेत तटकरे,राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे,राजिप मुुख्याधिकारी डाॅ.किरण पाटील, महीला व बाल कल्याण सभापती गीता जाधव,तळा नगराध्यक्षा रेश्मा मुुंढे,राजीप सदस्य बबन चाचले, पं.स.सभापती देविकालासेउपसभापतीगणेशवाघमारे, सदस्य अक्षरा कदम महागाव ग्रामपंचायत सरपंच सुषमा कसबले, माजी सरपंच विठोबा साबळे आदि मान्यवर उपस्थित होते.
महागाव आरोग्य केंद्राचे ऑनलाईन उदघाटन केल्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कोरोनामुळे जगाची घडी विस्कटली असली तरी स्वच्छता, शिस्त यांचे नव्याने पालन करुन कोरोनावर मात करण्यात येईल.कोकण हा स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असुन महागाव आरोग्य केंद्रात त्याचे कटाक्षाने पालन होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.आरोग्य केंद्र मंजुर झाल्यानंतर या आरोग्य केंद्रासाठी चौदा जणांचा स्टाफ मंजुर होतो परंतु आमच्या मंत्री मंडळातील सहकारी अदिती तटकरे यांनी महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी आणि कर्मचारी रिक्त पदे भरण्यासाठी मागणी केली आहे.राज्याचा आरोग्यमंत्री म्हणुन ती माझी जबाबदारी असुन या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लागणारी यंत्र सामुग्री देण्या बरोबरच सर्व सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.खा.सुनिल तटकरे यांच्या मागणी नुसार मेडिकल कॉलेज लवकरच रायगड जिल्हात येणार असुन अंतिम कागदपत्रांवर माझी सही झाले असल्याचे त्यांनी सांगितले.कोवीड-19 या संसर्गजन्य रोगाशी लढादेण्यासाठी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका चांगल्या प्रकारे काम करत असुन त्यांनी सर्वांचे यावेळी अभिनंदन केले. रायगड जिल्हामध्ये कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली मुंबई उपनगरालगत हा जिल्हा येत असल्याने नियोजनबध्द कामकाज करणे गरजेचे आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सर्वांनी गावपातळीवर राबवुन शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले व महागाव आरोग्य केंद्राचे उदघाटन झाले असल्याचे जाहीर केले. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे महागाव विभागातील सर्व सामान्य जनतेचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार असुन या केंद्रासाठी खा.सुनिल तटकरे यांचे योगदान मोठे असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले त्याचप्रमाणे या केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन देणारे दानशुर व्यक्तिमत्व यांचे देखील आभार मानले व त्यांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन यथोचित सत्कार केला.रायगड जिल्हात मंजुर झालेल्या मेडिकल कॉलेजसाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अंतिम मंजुरी दिल्या बद्दल त्यांचे आभार मानले.
Post a Comment