म्हसळा तालुक्यांत१६ गावांतून नवीन रास्त भाव धान्य दुकान मंजूर



संजय खांबेटे : म्हसळा

म्हसळा तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात १६ नवीन रास्त भाव धान्य दुकान मंजूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जिल्हाधि कारी रायगड यानी निश्चित केला आहे.तालुक्यातील आगरवाडा, तोंडसुरे ,जांभूळ , नेवरुळ ,खारगाव बुद्रुक, सुरई, चिखलप, चिरगाव,निगडी,रोहिणी मोहम्मद खानीखार, आडी महाड खाडी, तोराडी, भेकऱ्याचा कोंड, घोणसे, चिचोंडा या १६ गावांत शासनाला नवीन रास्त भाव धान्य दुकान सुरू करण्या ची आहेत ही बहुतांश गावे ६०० ते ९५० लोकसंखेची आहेत.नवीन रास्त भाव धान्य दुकान मिळण्यासाठी प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था याना आहे.
नवीन रास्त भाव शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजूर करण्याकरिता जाहीरनामा काढणे व प्रसिद्ध करणे (स्थगनादेश नसल्यास) दि. 14 सप्टेंबर 2020. संस्थांना अर्ज करण्याकरिता मुदत (30 दिवस) दि. 14 सप्टेंबर ते दि. 13 ऑक्टोबर 2020 पर्यंत आहे नवीन दुकानाकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक तपासणी छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पूर्ण करणे (30 दिवस) दि. 14 ऑक्टोबर ते दिनांक 13 नोव्हेंबर 2020 पर्यंत. करण्यात येणार आहे.अर्जाचा नमुना तहसिलदार कार्यालया मध्ये उपलब्ध आसल्याचे पुरवठा विभागाने कळविले आहे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा