प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
तालुक्यातील खरसई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, खरसई गावचे माजी सरपंच श्री नामदेव धोंडू कांबळे, वय ९२ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. खरसई गावच्या शैक्षणिक, सामाजिक तसेच संस्कृतीक कार्यात कांबळे यांचे भरीव योगदान होते. खरसई गावासाठी खूप वर्ष समाजसेवेत तत्पर असे व्यक्तिमत्व, जेष्ठ कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत सरपंच, खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ, खरसई चे माजी अध्यक्ष, श्री हनुमान आळी मंडळ खरसई मंडळाचे अध्यक्ष, अशी अनेक पदे भूषविणाऱ्या श्री नामदेव धोंडू कांबळे भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या पश्चात श्री.अनंत नामदेव कांबळे .श्री.रामदास नामदेव कांबळे. श्री.प्रभाकर नामदेव कांबळे.श्री. भास्कर नामदेव कांबळे.श्री. किशोर नामदेव कांबळे मुली सौ पुष्पा शितकर् सौ इंदू कांबळे सौ लैला शितकर (6 मुले, 3 मुली) आणि २७ नातू असा मोठा परिवार आहे.
Post a Comment