श्रीवर्धन नगरपालिका नगराध्यक्षपदा साठी दोन उमेदवारी अर्ज दाखल ,संख्याबळ पाहता जितेंद्र सातनाक यांची निवड निश्चित .


श्रीवर्धन (विजय गिरी):- श्रीवर्धन नगरपालिकेचे नगराध्यक्ष भुसाणे  हे दीर्घ कालीन रजेवर गेल्याने तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे पद जिल्हाधिकारी अलिबाग यांनी रद्द केले .व नगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर केली .23 सप्टेंबर 2020 रोजी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल करायचे होते .शिवसेनेकडून नगरसेवक अनंत गुरव तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस व शेकाप आघाडीद्वारे उप नगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांचा उमेरवारी अर्ज दाखल करण्यात आला .संख्याबळ पाहता जितेंद्र सातनाक यांची निवड निश्चित मानली जात आहे .दि 24 रोजी अर्ज छाननी असुन दिनांक 25 रोजी नगरसेवकांच्या मतदानातून निवड होणार आहे  nनिवडणूक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून किरण मोरे काम पाहत आहेत ,आघाडीचे नगरसेवक खासदार तटकरे साहेबांच्या शब्दाबाहेर नसल्याने दगाफटका होण्याची सुतराम शक्यता नाही .प्रत्यक्ष मतदान झाले तरी सातनाक यांचे पारडे जड असल्याने दि 25 सप्टेंबर रोजी सातनाक यांना पुढील नगराध्यक्ष म्हणून अधिकृतरीत्या पदभार मिळेल .आघाडी तर्फे सातनाक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार अनिकेतभाई तटकरे उपस्थित होते .सकाळी 10वाजताच आम अनिकेतभाई नगरपालिका कार्यालयात दाखल  झाले .नगरपालिकेत आल्यानंतर त्यांनी आघाडीच्या प्रत्येक नगरसेवकाचे मत जाणून घेऊन चर्चा केली .या चर्चेत आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या निवडीचे अधिकार खासदार सुनील तटकरे साहेबाना दिले .सर्वांची मते जाणून घेतल्यावर पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या समवेत मोबाईल वरून खासदार तटकरे साहेबानी आपल्याला सर्वानी निवडीचे अधिकार दिल्याने सर्वांचे आभार मानत उर्वरित कालावधीतील पहिल्या सहा महिन्यासाठी प्रभारी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांना व पुढील उर्वरित कालावधीसाठी फैसल हुरजूक याना संधी दिल्याचे जाहीर केले .तसेच उपनगराध्यक्ष पदासाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करून उपनगराध्यक्ष  पदावर नगरसेवकांना संधी देण्याचे जाहीर केले .या वेळी मोबाईल वरून संवाद साधताना तटकरे साहेब म्हणाले कीं श्रीवर्धन करांनी तटकरे कुटुंबियांना या आधी खूप साथ दिली तशीच साथ पुढे राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली . प्रक्रिया खेळी  मेळीच्या वातावरणात पार पडली .या वेळी सर्व नगरसेवक तालुका अध्यक्ष दर्शन विचारे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थति होते .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा