किरण काशिराम शिंदे/लोणेरे
संपूर्ण जगावर कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे मूर्तीच्या मागणीत घट गणेश उत्सव आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन एक वेगळीच शक्ती ,उर्जा आपल्या मनात शरीरात निर्माण होत असते या दिवशी तितक्याच जोमाने जोशाने आपण आपल्या बाप्पाचे स्वागत करणार ते ही योग्य काळजी घेत यात शंका नाही यंदाचे वर्ष हे सर्वच सणावारांचे नुकसान देयक वर्ष ठरले आहे .आता आपल्या सर्वांचा महत्वाचा सण गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारचे काही कठीण निर्णय आणि बंधन पालत आपण आपल्या बाप्पाचे स्वागत करणार आहोत याचे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमना पूर्वी बाप्पाच्या मूर्तीचे सुबक
व देखणे रूप देण्याच्या शेवटच्या टप्प्यात गोरेगावातील नेमाने बंधू यांची तयारी वेगात चालू आहे अगदी सरकारचे सगळे नियम पाळत सार्वजनिक गणेश मूर्ती चार फुटाची तर घरगुती गणेश मूर्ती दोन फुटापर्यंत त्यांनी प्रत्येक गणेशमूर्तीला एक जिवंतपणाचे रूप दिले आहे सुबक सुंदर देखण्या अशा गणेश मूर्ती या कलादालनात कलर करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव सर्वत्रच आहे. त्यामुळे मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांनी गावी न येता मुंबईतच राहणे पसंत केल्याने गणेशमूर्तीच्या मागणीत तीस टक्के घट झाली आहे.कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव आणि गर्दीचे प्रमाण या सर्व गोष्टी लक्षात घेता नेमाने बंधूनी गोरेगाव शेजारील खेड्यापाड्यांमध्ये गणेश मूर्ती घरपोच देण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले या त्यांच्या निर्णयाचं गोरेगाव तसेच आजूबाजूच्या गावातून कौतुकाची थाप मिळत आहे
Post a Comment