श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे पुल ढासळतोय ; अवजड वाहतुकीस बंदी

श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे पुल  ढासळतोय

 सभापती बाबुराव चोरगे यांच्याकडून पुलाची पाहणी 

 अवजड वाहतुकीस बंदी 

 श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

 श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे  नदीवरील जुना पुल ढासळत आहे त्यामुळे सदरच्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आलेली आहे. श्रीवर्धन पंचायत समिती सभापती बाबुराव चोरगे यांनी मंगळवारी दुपारी पुलाची पाहणी केली आहे. श्रीवर्धन ला ऑगस्टमध्ये निरंतर एक आठवडा जोरदार पाऊस पडलेला आहे. जावेळे पुलाची बांधणी  जावेळे नदी वरती करण्यात आलेली आहे. साधारणतः पुलाचे बांधकाम अंदाजे चाळीस वर्षांपूर्वीचे असावे असे स्थानिक  जनतेकडून समजले. पुलाची बांधणी ही दगडी स्वरूपात असून वरच्या बाजूस सिमेंट व लोखंडाचा वापर केल्याचे दिसून येत आहे. तसेच पायथ्याच्या कामकाजासाठी दगड व इतर साहित्याचा वापर केलेला आहे. पुलाची लांबी अंदाजे २० फूट रुंदी १४ फूट व खोली अंदाज १८ फूट आहे. पुलाच्या दुतर्फा सिमेंटचे एक फुटाचे संरक्षक कठडे बांधण्यात आलेले होते. पुला वरती पावसामुळे दोन्ही बाजूला अंदाजे सहा इंच पेक्षा जास्त उंचीचे गवत उगवलेले आहे.   पुलाचा आधार असलेल्या तीन संरक्षक भिंती पैकी एक संरक्षक भिंत ढासळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिक जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी यांच्याकडे दूरध्वनीद्वारे मनोहर सावंत या व्यक्तीने संबंधित घटनेची माहिती सोमवारी सायंकाळी कळवली होती त्यानंतर श्रीवर्धन तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेत सदर पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. जावेळे पुलावरून  वडशेत वावे, धारवली,  आडी कोलमंडला, साखरोने, कारवीने या गावांचे दळणवळण चालते. मात्र आजमितीस कोणतेही अवजड, वाहन पुलावरून गेल्यास अपघात होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. श्रीवर्धन पोलीस दलाकडून पुलाच्या दोन्ही मार्गावर पुल वाहतुकीस बंद असल्याबाबत मार्ग रोधक लावण्यात आलेले आहेत. पुलाच्या खालून जावेळे  नदीचा प्रवाह जोरात वाहत आहे. नदीचे पात्र दोन्ही बाजूस विस्तारित स्वरुपाची आहे. पुलाच्या बरोबर मध्यभागी  काही अंशी पूल खचलेला  निदर्शनास येत आहेत. त्यामुळे सदर चा मार्ग वाहतुकीस धोकादायक ठरू शकतो. साखरोने , धारवली,  आडी या गावातील लोकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करणे अगत्याचे झाले आहे. दुचाकीस्वार किंवा पादचारी पुलावरून जाऊ शकतो मात्र कोणतेही चार चाकी वाहन पुलावर  गेल्यास अपघाताची शक्यता निर्माण झालेली आहे. जावळे गावातील स्वयंभू शिवमंदिराच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात श्रीवर्धन तालुक्यातील विविध भागातून लोक दर्शनासाठी जातात मात्र जावेळे पुल क्षतीग्रस्त झाल्यामुळे तालुक्यातील शिवभक्तांना दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. पंचायत समिती सभापती बाबुराब चोरगे, गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे, जावेळे  सरपंच व ग्रामस्थ यांनी मंगळवारी  पुलाची पाहणी केली आहे. 

वडशेत  वावे गावातील व्यक्तींने पुल ढासळण्यास सुरुवात झाल्याची माहिती कळवल्यानंतर तात्काळ संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणेला याविषयी आदेश निर्गमित केलेले आहेत. सद्यस्थितीत जावेळे पूल वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे.... सचिन गोसावी  ( तहसीलदार श्रीवर्धन )

 मंगळवारी सकाळी जावेळे  पुलाची पाहणी केली. सद्यस्थितीत पूल वाहतुकीस धोकादायक बनलेला आहे. मात्र गणपती उत्सव असल्याकारणाने लोकांची गैरसोय होऊ नये या अनुषंगाने  संबंधित बांधकाम खात्याने तात्काळ पर्यायी उपाय  योजना करणे गरजेचे आहे..... बाबुराव चोरगे( सभापती श्रीवर्धन पंचायत समिती)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा