देवधर येथील नदी दुथडी भरून वाहताना
हवामान खात्याच्या मुसळधार अतिवृष्टी होण्याच्या शक्यते प्रमाणे म्हसळयात आज धुँवाघार पाऊस : सरासरी नक्कीच गाठणार
संजय खांबेटे : म्हसळा
हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या संकेतानुसार म्हसळा तालुक्यांत गेले ४८ तास धुँवाघार पाऊस पडत असून तालुक्यातील मुख्य नदी जानसईसह सर्व उपनद्या व ओढे दुथडी भरून वहात आहेत.म्हसळा तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ३६०० मि.मी ते३८०० मि.मि.आहे. कालपर्यंत तालुक्यात १८२७ मि.मि. पावसाची नोंद आहे आजच्या दिवसभरांत किमान २०० ते २५० मि.मि. पाऊस पडला असण्याची शक्यता आहे..म्हसळा तालुक्यात आतापर्यंत पडलेला पाऊस गेल्या वर्षाचे तुलनेने १३०५ मिमी ने कमी पडला आहे.पण सरासरी पर्जन्यमान नक्की पूर्ण होईल असा जाणकारांचा अंदाज आहे. गेले दोन दिवस सोसाट्याचा वादळी वारा व उलट- सुलट पडणाऱ्या पावसाने तालुक्यातील काही घरांचे व गुरांच्या वाडयाचे पत्रे उडाल्याचे समजते.तालुक्या- तील ग्रामिण भागांतून आज दुरवर शेती मशागती साठी गेलेल्या शेतकऱ्यांची व गुरे घेऊन गेलेल्या गुराख्यांची नदी ओढ्याना पाणी भरल्याने घराकडे परत येण्यास पाण्याच्या ओघामुळे अडचणीचे ठरत होते.तालुक्यात अतिवृष्टीमुळे कोणत्याही नुकसानीची नोंद नसल्याचे समजते.२ आॅगस्ट पासून सुरू झालेल्या आश्लेषा नक्षत्राचे वाहन मेंढा,१६ आॅगस्ट पासून सुरू होणाऱ्या मघा नक्षत्राचे वाहन म्हैस ,रविवार दि.३०आॅगस्ट पासून सुरु होणाऱ्या पूर्वा नक्षत्राचे वाहन बेडूक असल्याने तालुक्यात सरासरी प्रमाणे कदाचित त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता जाणकार मंडळी वर्तवीत आहेत.
खरसई श्रीसोमाजाई माता मंदीरा जवळलील ओढ्यांतून गुरे व शेतकरी बाहेर काढताना होत असलेली कसरत
Post a Comment