म्हसळा करांसाठी आनंदाची बातमी
१-२-३ नाही चारपण नाही आज म्हसळयात कोरोनाचा एकही रुग्ण बाधीत नाही : तब्बल 41 बाधीत रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमीअधिक होत असताना बाधितांचे संख्येत दिवसाआड दोन चार रुग्णांची भर पडत होती आज मात्र एकही बाधीत रुग्ण सापडला नाही ही म्हसळा कराना आनंदाची बातमी आहे. आज एकाच वेळी तब्बल 41 कोरोना बाधीत रुग्ण कोरोनाच्या संकटावर यशस्वी मात करून घरी परतले असल्याची माहिती म्हसळा तहसीलदार तथा कोव्हीड(19) चे तालुका कमांडर शरद गोसावी यांनी दिली.आज बरे झालेल्यांमध्ये 36 रोहिणी यार्डातील कामगार तर तुरूंबाडी येथील 3,तोंडसुरे येथील एक आणि म्हसळा कन्याशाळा येथील एकाचा समावेशआहे. तालुक्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या द्विशतका पारम्हणजे 203 आहे, पैकी 166 जण कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले आहेत 7 जणांचा मृत्यु तर 30 जणांवर उपचार सुरु असून तेही परतीच्या मार्गावर आसल्याचे नोडल वैद्यकिय अधिक्षक महेश मेहता यानी सांगितले.म्हसळा तालुक्यातील नागरिकांनी सातत्याने हात धुणे, मास्क वापरणे, २ गज सोशल डिस्टंस ह्या बाबत विशेष काळजी घेतली तर तालुका कोरोना मुक्त होण्यास फार अवधी लागणार नाही अशी चर्चा वैद्यकिय क्षेत्रांतील मंडळी करीत आहेत.
Post a Comment