वेळास,आदगाव मध्ये जिवो नेटवर्क चा उडाला फज्जा.


वेळास,आदगाव मध्ये जिवो नेटवर्क चा उडाला फज्जा...
स्थानिकांनमध्ये संतापाचे वातावरण ; श्रीवर्धन भाजपा विद्यार्थी सेनेचा तोडफोडीचा इशारा

पुष्कर रीलकर : बोर्ली
   श्रीवर्धन तालुक्यातील वेळास या गावामध्ये गेली कित्येक वर्ष कोणत्याही कंपनीच नेटवर्क नव्हतं.गेल्या 2 वर्ष भरापासुन या गावात जिओ कंपनीच नेटवर्क चालु झाला आहे.परंतु गेल्या अनेक महिन्यांपासुन जिओ कंपनीच्या नेटवर्क चा इकडे फज्जा उडाला आहे.यामुळे ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
    वेळास,आदगाव या गावांमध्ये तीन राजिप च्या शाळा,एक हायस्कुल आहेत. जवळ जवळ 400-500 विद्यार्थी या शाळा मध्ये क्षिक्षण घेत आहेत.गेल्या 5 महिन्यापासुन कोरोना मुळे सरकारने लाँकडाऊन केला आहे.आणि आता शाळांमधुन आँनलाइन क्षिक्षण चालु केला आहे.पण या गावांमध्ये नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
सध्या दूरध्वनी सेवेमधून कोरोनाच्या संबंधित बातम्या ,वादळात झालेले नुकसान किंवा अत्यावश्यक सेवेतील गोष्टी या मोबाईल द्वारे कराव्या लागतात यासाठी ग्राहक आतूरलेले असतात. परंतु या भागात सक्षम नेटवर्क नसल्यामुळे या गोष्टी करता येत नाहीत त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
     सध्या इंटरनेटच्या युगामध्ये सर्व कार्यालये,सरकारी दप्तरे ऑनलाईन पद्धतीने जोडली गेली आहेत. परंतु सध्या नेटवर्क देणाऱ्या कंपनीच्या सेवेला घरघर लागली असून नेटवर्क नसण्याचे प्रकार वाढले आहेत ग्राहकांनी केलेले दोन व तीन महिन्यांचे रिचार्जे कोणत्याही प्रकारची इंटरनेट सुविधा न वापरता संपत असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. मागील वर्ष भरा पासून खंडित होणाऱ्या सेवेकडे अधिकारी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे व्होडाफोन, आयडिया, अशा स्वरूपातील असलेली मोबाइल नेटवर्क किंवा इंटरनेट सेवा गेल्या अनेक वर्षापासून साफ कोलडमली असल्याचे दिसते श्रीवर्धन शहर तसेच म्हसळा शहर या ठिकाणी सर्वत्र सर्वच कंपन्यांचे नेटवर्क सुरळीत चालू आहेत मात्र श्रीवर्धन तालुक्यातील वेळास,आदगाव या गावांकडे अधिकारी का दुर्लक्ष करीत आहेत असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

सामान्य जनतेला याचा नाहक त्रास होत आहे. आपले शहरी भागात अडकलेले आप्तेष्ट यांच्याशी संपर्क होत नसल्याने वारंवार तक्रार देऊनही मोबाइल कंपन्या लक्ष नसल्यासारख्या अविर्भावात आहेत. वारंवार ग्रामपंचायत यांच्याकडेही सामान्य जनतेने तक्रार मांडली आहेच, हीच तक्रार टेलिकॉम कंपन्यांना सुध्दा दिली आहे. परंतू तक्रार निवारण काहीच होताना दिसत नाही.
   मोबाइल कंपन्या उभ्या आहेत त्यांनी यासर्वांकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे, नाहीतर या परिसराची अवस्था २०२० सालात सुध्दा कणा मोडल्यासारखी राहील. ग्राहक सर्वच दुरध्वनी व मोबाईल सेवेला त्रासली असून कंपनी सुरळीत व उत्तम दर्जाची सेवा केव्हा देणार असा प्रश्न नागरिकांना मध्ये आहे या सेवेचा मागील काही महिन्या पासून फज्जा उडाला असून यामुळे ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे परंतु या सेवेकडे कोणतेही अधिकारी चांगल्या व अखंडित सेवेसाठी तत्पर दिसत नसल्याने दूरध्वनी व मोबाईल नेटवर्किंग सेवेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
 
जिवो कंपनीच्या अधिकार्यांशी संपर्क केला होता परंतु त्यांनी अजुन पर्यंत गावात नेटवर्क येण्यासाठी कोणताही काम केलेला दिसत नाही. -(श्री.आशुतोष पाटील, सरपंच वेळास ग्रामपंचायत)


कोरोनामुळे सर्व शाळा,काँलेज बंद आहेत त्या मुळे विद्यार्थांना आँनलाइन क्षिक्षण दिले जात आहे.परंतु नेटवर्क नसल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांचे शैक्षिणक नुकसान होत आहे.येत्या 7-8 दिवसात नेटवर्क पुरर्वत झाला नाही तर होणार्या नुकसानीसाठी पुर्णपणे नेटवर्क कंपन्या जबाबदार असतील. -  (श्री.निलेश पाटील, भाजपा विद्यार्थीसेना अध्यक्ष,ता.श्रीवर्धन)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा