भूमी अभिलेख तळा कार्यालयाला जनताच टाळे ठोकणार.



तळा (किशोर पितळे) तळा तालुका निर्मिती होऊन२१
वर्षाचा कालखंड लोटला आहे.माणगांव तालुका विभाजन होऊनही या कार्यालयात आकृतीबंधाप्रमाणे १५पदे मंजूर असूनहीअनेक पदे रिक्त आहेत.याबाबत
जिल्हा अधीक्षक भूमी अभीलेख कडे आमच्या प्रतिनिधीनी वृतपत्राच्या माध्यमातून समस्या प्रसिद्ध
केली व दूरध्वनीवरून संपर्क साधलेला असूनही सदर रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया उपसंचालक विभागीय  कार्यालय कोकणभवन येथून भरली जातात.जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणीपदे रिक्त असल्याने सद्या काही करू शकत नाहीअसेउत्तर दिलेजाते.सद्यस्थितीत३कर्मचारी

कार्यरत आहेत.त्यावर इतर कामाचा अतिरिक्त भार आहेत वेळेवर कामे होत नसल्याने जनताच टाळे ठोकणार आहे हे महसुली महत्त्वाचे कार्यालय असून शासन याकडे लक्ष देत नाही.कार्यालय असून नसल्या सारखेच आहे.तालुका डोंगराळ दुर्गम भागात असून ६५गावे वाड्या वस्त्या आहेत.अनेकांना शासकीय कामासाठी यावे लागते.या कार्यालयातएकाकामासाठी अनेकवेळा खेटे मारून जनता त्रस्त झालीआहेसमस्या समजून जाणून घेण्यासाठी भूमीअधीक्षकच नाही.या कार्यालयाचा अतिरिक्त भार मुरुड भूमीअधीक्षकाकडे आहेत्यामुळेवेळेवरउपस्थित नसतात.त्यामुळे कामाचा निपटारा होत नाही याबाबत समस्या विविध पक्षाने पुढारी,कार्यकर्ते, स्थानिक प्रतिनिधीच्या मार्फत 
लोकप्रतिनिधीकडे पोहचलेली असूनहीअनेक विकास कामापासून व विविध समस्या पासुन तालुका नेहमी उपेक्षित राहिला आहे.तरी त्वरीत पदे भरण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनताच टाळे ठोकणार आहे.जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत कार्यालय उघडूनदिलेजाणारनाही.तरी मा.पालकमंत्री, मा.
जिल्हाधिकारी, मा.जिल्हा अधिक्षक भुमीअभिलेख यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.


जिल्हा भुमीअधिक्षक साहेबांकडे याबाबत(रिक्तजागा) अनेक वेळा लेखी व तोंंडी मागणी केली आहे. सदर रिक्त पदे भरण्याची प्रोसीजर मा.उपसंचालक कोकण प्रदेश कोकण भवन मुंबई कार्यालयाकडून होत असते सर्व रिपोर्ट जिल्हा कार्यालयाकडून जात असतात. माझ्याकडे देखील मुरुड व तळाचा अतीरिक्त भार असून कर्मचारी वर्ग कमी असल्याने कामे वेळेत होत नाहीत.वअतीरिक्त कामाचा बोजा इतर कर्मचाऱ्यावर पडतो.मागणी करूनही इतर तात्पुरती व्यवसाय केली जात नाही.
योगेश कातडे, उपअधिक्षक भुमीअभिलेख तळा रायगड

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा