जानसई नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह तिसऱ्यादिवशी पाभरे -निगडी येथे सापडला


 
संजय खांबेटे : म्हसळा

म्हसळा तालुक्यातील जानसई नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या बदर अब्दल्ला हलदे (वय२३) या तरुणाचा मृतदेह आज तिसऱ्या दिवशी पाभरे निगडी येथे सापडला आहे.नदीत पोहायला गेला असताना तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला होतामुसळधार पावसामुळे म्हसळा शहराशेजारील म्हसळा-पाभरे जानसई नदी तुडुंब भरून वाहत होती.५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाभरे फाटा पूल येथील जानसई नदीच्या पात्रात बदर हलदे (रा.दिघी रोड, म्हसळा) त्याच्या मित्रांसोबत पोहायला गेला होता.पुलावरून चार-पाच मुलांनी नदीत पोहण्यासाठी उड्या मारल्या.बदरनेही उडी मारली मात्र खळवळलेल्या जानसई नदीच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने,तो प्रवाहासोबत वाहून गेला.तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता.आज (७ऑगस्ट) रोजी सकाळी बदरचा मृतदेह घटनास्थळावरून साधारण ५ किमी अंतरावर पाभरे निगडी खाडीत आढळून आला आहे.सदरचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून,पुढील कार्यवाही सुरू आहे

1 Comments

  1. 3 जून रोजी झालेल्या चक्रीवादलामुळे नुकसान, व त्याची नुकसान भरपाई चिचोंडे गावामधील लोकांना कधी मिळणार,

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा