कोरोनावर मात करून पोलीस हवालदार आपल्या कर्तव्यावर रूजू



तळा(किशोर पितळे)तळा पोलिस ठाण्यातील एका कोरोना योध्दयाला कोरोना झाला होता.त्यांच्या कुटुंबातील पत्नी व८महिन्याचा मुलगा १५जुलै रोजी कोरोना वर मात करून ठणठणीत बरे होऊन सुखरूप घरी आले.गोविंद शिंदे पोलीस हवालदार या कोरोना योध्द्याने कोरोनावर मात करून १अॉगस्ट रोजी तळा पोलिस ठाणे येथे आपल्या सेवेतील कर्तव्यावर रूजू झाले आहेत.रायगड जिल्ह्यात तळा तालुका हा दुर्गम डोंगराळ तालुका म्हणुनओळखला जातो यातालुक्यात सर्वाधिक बावीस हजार चाकरमानी दाखल झालेहोते. सुरवातीस  हा तालुका कोरानामुक्त होता परंतु मधल्या काळात लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल झाल्यानंतर कोरोना पाॅजेटीव्ह रुग्ण आढळुन आल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले होते.मात्र तालुक्यातील प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज असल्याने लाॅकडाऊचे पालन नियमितपणे करण्यात आले ज्या व्यक्तींना कोरोना विषाणुचीबाधा झालीहोतीते रुग्णउपचारानंतर पुर्ण पणे बरे झाले आहेत.केवळ एका रुग्णावर सध्या उपचार सुरु असल्याने तळेवासियांना दिलासामिळाला असुन शासनाचे नियम पाळत कोरोनावर मात करण्याचे आवाहन प्रशासन आणि पोलीस यंत्रणे मार्फत करण्यात येतआहे.या काळातकोरोना योध्दा म्हणून आपली सेवा देत असताना या कोरोना योध्द्याला कोरोना झाल्याचे लक्षणे जाणवू लागल्याने कोरोना विषाणू चाचणी करण्यात आली. कोरोना पाँझेटिव्ह रिपोर्ट ७जुलै रोजी निष्पन्न झाले होते त्यानंतर त्वरीत या कोरोना योध्द्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्यावर उपचार करून बरे होऊन ते १५ जुलै घरी आले.त्यानंतर ते १४ दिवस होम क्वारंटाईन होते.प्रकृती ठीक झाल्यानेडॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा कोरोना योध्दा १ अॉगस्ट रोजी तळा पोलिस ठाणे येथे आपल्याकर्तव्यावर रूजूझाले आहेत यावेळी तळा पोलिस निरीक्षक सुरेश गेंगजे व सहा. पो.नि.अश्विनी मोहिते अधिकारीवपोलिसकर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात पुष्प देऊन व पुष्पवर्षाव करून स्वागत केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा