तळा तालुक्यात कोरोनाचा कहर.शहरात, प्रा.आ.केंद्र व स्टेट बँकेत शिरकाव.


तळा तालुक्यात कोरोनाचा कहर.शहरात, प्रा.आ.केंद्र व स्टेट बँकेत शिरकाव. एकुण संख्या२९

तळा (किशोर पितळे)तळा शहरात कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याने नागरीकांमध्ये भिती चे

वातावरण निर्माण झाले आहे. आजपर्यंत मर्यादित असलेला कोरोना ने आपले डोळे वटारले असून काल

उशिरापर्यंत प्राप्त झालेल्या माहिती नुसार शहरातील

स्टेट बँक येथील शिपाई कर्मचारी३५वर्षीय१(मांदाड) प्राथमिक आरोग्य केंद्र२कर्मचारी,शहरात२८वर्षीय १व्यक्ती, तालुक्यातील रोवळा ४oवर्षीय १व्यक्ती व शहरातील मेट मोहल्ला येथील १व्यक्ती अशी सहा पाँझेटीव्ह रिपोर्ट प्राप्त झालेआहेत.त्यामुळे एकूण संख्या २९ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बँकेत कोरोनाचा शिरकाव केला आहे तळा तालुका आणि शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबधित रुग्णाची संख्या घटत असताना आता तालुक्यातील आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारे तळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोनाने शिरकाव केला असून येथील  कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पाॅजेटिव्ह आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया तळा शाखेत देखील एका कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पाॅजेटिव्ह आल्याने सध्या तळा शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बँकेत कोरोना रुग्ण आढळल्यानंतर दोन्ही विभागातील कर्मचारी यांची ताबडतोब माणगाव उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यातआली त्यापैकी आरोग्य विभागातील एक कर्मचारी आणि बँकेतील एक कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पाॅझेटिव्ह आली आहे.तुर्तास ज्यांची चाचणी पाॅझेटीव्ह आली आहे त्यांना लोणेरे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असुन खबरदारी म्हणुन प्राथमिक आरोग्य केंद्र दोन दिवस बंद ठेवण्यात आले होते दोन दिवसानंतर कामकाज सुरळीत सुरु करण्यात आले आहे स्टेट बँक ऑफ इंडिया देखील दोन दिवस बंद ठेऊन आजपासुन कामकाज सुरळीत सुरु करण्यात आले आहे.रोवळा येथील एका तरुणाचाही कोरोना रिपोर्ट पाॅजेटिव्ह आला आहे.तळा शहरातील एका तरुणांचा  तळा-मांदाड रस्त्यावर काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता या तरुणावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली असता त्याचा रिपोर्ट पाॅजेटीव्हआला असल्याने तालुक्यातील कोरोना रुगणांची एकुण संख्या२९ झाली असुन बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.२९ पैकी २ रुग्णांचा मृत्यू झाला असुन सहा जणांवर उपचार सुरु असुन २१ रुग्ण ठणठणीत बरे होउन आपल्या घरी परतले आहेत.बदलत्या वातावरणाचा फटका बसत कोरोना पॉझिटीव्हचा आकडा तळा ताालुक्यातवाढताना दिसतआहे.शहरातील दोन कोरोना बाधीतव्यक्तीच्याघरातीलव्यक्तीनाखबरदारीचा उपाय म्हणून होम क्वाँरंटाईन करण्यात आले आहे.

तळेवासियांनी कोरोनाला घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेऊन यशस्वीपणे सामना करणे आवश्यक बनले असून लॉकडाऊन काळात नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये,तसेच नेहमी मास्कचा वापर करावा कासव गतीने वाढ होत असली तरी कसा प्रसार होईल ते कळणार नाही.तरी देखील अजूनही जनता गांभीर्याने घेत नाही.त्यामुळे ग्रामीण भागात देखील कोरोना रोगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.याला रोखण्यासाठी स्वतःप्रयत्न केले तरच लवकर कोरोना मुक्त होऊ शकतोयासाठी प्रशासन प्रयत्न करीतआहे.अशी माहिती तळा तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आसून प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करा. सुरक्षित रहा.आपल्या बरोबर इतरांची काळजी घ्या आवश्यक काम असेल तरच बाहेर पडा. प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा