म्हसळयाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले ; 03 जूनच्या कटू आठवणी जाग्या झाल्या


म्हसळयाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले

● दोन दिवस दमदार बरसल्या श्रावण सरी

● नागरिकांना 03 जूनच्या आठवणी जाग्या झाल्या

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

डोंगर कपारीत वसलेल्या म्हसळा तालुक्यात दरवर्षी सरासरी 3600 मिमी ते 4000 मिमी इतका पाऊस पडतो या वर्षी मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प असुन मागील दोन महिन्यांत आता पर्यंत अवघा 1825 मिमी इतका पाऊस पडला आहे. हवामान खात्याने कोकणात चार ते पाच दिवस दमदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला होता त्या नुसार म्हसळा येथे दोन दिवस दमदार श्रावणसरी वादळी वाऱ्यासह कोसळत आहेत. दिनांक 4 जुलै रोजी म्हसळा येथे 165 मिमी इतका पाऊस पडला असल्याची नोंद तहसीलदार कार्यालयात करण्यात आली आहे. म्हसळा येथे आतापर्यंत पडलेला हा पाऊस गेल्या वर्षाचे तुलनेने 1305 मिमी ने कमी पडला आहे. गेल्या वर्षी 4 जुलै पर्यंत म्हसळा तालुक्यात 3130 मिमी पावसाची नोंद आहे. ह्या वर्षी पडत असलेला पाऊस शेतीला पूरक असुन तो भविष्यात पिण्यासाठी अपुरा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील बहुतांशी गावांची लोकवस्ती डोंगरावर वसलेली असल्याने तेथील नळ पाणी पुरवठा योजना विंधन विहिरीवर अवलंबून आहेत पुढील काही दिवस जर पाऊस जास्त प्रमाणात पडला तरच म्हसळा येथील गावांना उन्हाळ्यात अखेरीस पाणी पुरवठा होतो अन्यथा येथील लोकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. या वर्षी श्रावणात पडत असलेला पाऊस पुढील महिना दिड महिना असाच पडत राहिला तर तालुक्यातील पाणी टंचाई कमी होण्यास मदतीचे ठरणार आहे. दिनांक 3 आणि 4 जुलै रोजी म्हसळा तालुक्यात कोसळलेल्या वादळी पावसाने तालुक्यातील नद्यानाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर वादळी पावसाने काही गावांमध्ये घरांवरील पत्रे व कौले उडाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा