बोर्लीपंचतन येथील गफारशेठ मेमन यांचे निधन ; उद्योग क्षेत्रातील तारा निखळला.



बोर्लीपंचतन (मकरंद जाधव)
बोर्लीपंचतन येथील प्रसीध्द उद्योगपती गफारशेठ मेमन यांचे मंगळवार दि.११ आॕगस्ट रोजी सायंकाळी पनवेल येथील अंजुमन रुग्णालयात वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी उपचार सुरु असताना निधन झाले गेले दोन महीने ते किरकोळ आजाराने त्रस्त होते त्यामुळे त्यांना मागील आठवड्यात पनवेल येथील अंजुमन रुग्णालयात दाखल केले होते.
 कष्ट करुन पैसे कमावून मोठे होण्याचे स्वप्न अनेकांकडून पाहिले जाते.त्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने प्रयत्नशीलही असते.या श्रीमंतीला गवसणी घालण्यासाठी मग अनेकजण उद्योग-व्यवसायात स्वत:ला झोकून देतात.असे विविध क्षेत्रांमध्ये उद्योगविस्तार करून श्रीमंत झालेल्या   उद्योगपतींची कमी नाही.मात्र,दानशूर उद्योगपती म्हणून नाव घ्यायचे झाल्यास श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील गफारशेठ मेमन यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. किराणा दुकानापासुन सुरु केलेला व्यवसाय ते त्यांच्या मुलांनी मेहनतीने मेडीकल,व तालुक्यातील मोठे बिल्डिंग मटेरीयल सप्लायर्स असा मिळवलेला लौकीक त्यांच्या उद्यमतेशीलची साक्ष देतो.व्यवसायात यशस्वी होताना आपण समाजाचे काही देणे लागतो या जाणिवेतुन बोर्लीपंचतन येथील जनता शिक्षण संस्थेच्या इमारतीसाठी असलेले योगदान असो अथवा गोरगरीबांसाठी वेळोवेळी केलेली मदत या त्यांच्या दानशुर वृत्तीबाबत त्यांचे जेष्ठ पुत्र महंमदभाई मेमन सांगतात की आमच्या वडीलांनी समाजासाठी जे काही केले ते आम्हां कुटुंबियांसाठी खूपच प्रेरणादायी आहे.वडील आम्हांला नेहमी सांगायचे की,मी तुमच्यासाठी तुम्हांला चांगलं आयुष्य जगण्याइतपत दिलेलं आहे.याऊपर जर तुम्हांला अजून काही हवं असेल तर ते तुम्ही स्वत: कमवा.उरलेलं मात्र तुम्ही समाजाला,आपल्या देशाला परत केलं पाहिजे.बगफारशेठ मेमन यांनी मुलांना दिलेला हा सल्ला आपणांस खूप काही शिकवून जातो.
अशा या मेमन कुटुबियांचे बॕ.ए.आर. अंतुले यांच्याजवळ घनिष्ठ संबध होते.त्यांचे अंतीम संस्कार पनवेल येथे त्यांचे नातेवाईक व आप्त स्वकीयांच्या उपस्थितित शोकाकुल अंतकरणाने पार पडले. त्यांच्या पश्चात मुले,मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा