ग्रामीण भागातील जनवाहिनी लालपरी तब्बल १४५
दिवसांनी रस्त्यावरआली ; प्रवाश्यांंनी लाभ घ्यावा.
आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे.
तळा (किशोर पितळे) संपूर्णजगात कोरोनाविषाणूजन्य संसर्ग रोगाची लागण होत असल्याने संक्रमण रोखण्या
साठी राज्य शासनानेप्रवासी वाहतुकीलाबंदीघालण्यात आली होती. सर्वसामान्याची जिव्हाळ्याची जनवाहिनी अर्थात लालपरी तब्बल१४५ दिवसांनंतर तळा तालुक्याच्या जनतेसाठी दि. १३ आँगस्ट पासून सेवेसाठी दाखल झाली आहे. ग्रामीण भागात सुरु करण्यात आली आहे.
तसेच चाकरमान्यांसाठी रोहा आगारातून सुटणार जादा बस सोडण्यात येणार आहेत.त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनरोहाआगार व्यवस्थापक सोनाली कांबळे यांनी केले आहे.कोंकणातआलेल्या चाकरमान्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाकरीता मुंबई, बोरीवली,ठाणे नालासोपारा या मार्गावर शुक्रवार दि.२८ ऑगस्ट ते रविवारी ३० ऑगस्ट याकालावधीत रायगड परीवहनच्या
रोहा आगारामार्फत एस.टी.बसेस सोडण्यात येणार आहेत.या मार्गांवर सोडण्यात येणा-या गाड्यांमधील रोहा आगारातून रोहा ते बोरीवली ही गाडी सकाळी १०.०० व दुपारी १४.०० वाजता सोडण्यात येईल. तसेच रोहा ते मुंबई सकाळी १३.00 वाजता, रोहा ते ठाणे सकाळी ९.०० वाजता, तळा ते नालासोपारा सकाळी ८.०० व दुपारी १४.०० वाजता, तळा ते मुंबई दुपारी १३.०० वाजता, तळा-इंदापूर- बोरीवली दुपारी १२.00 वाजता, तळा - रोहा -बोरीवली १५.००वाजता, कोलाड़ ते मुंबई १३.३० वाजता, कोलाड ते बोरीवली १४.३० वाजता सुटणार आहेत. प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रोहा आगाराने या विशेष जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्यांचे नियोजन गौरी गणपती विसर्जनाच्या दुस-या दिवसापासून फक्त तीन करण्यात आले आहे. मुदतवाढ झाल्यास रोहा आगाराकडून वेळोवेळी सुचित करण्यात येईल. अशी माहीती रोहा आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे यांनी दिली.
एसटी प्रवासादरम्यान एसटी प्रवासाकरीता ई - पासची आवश्यकता राहणार नाही, एका बसमध्ये फक्त २२ प्रवासी असतील तसेच ग्रुप बुकिंग करीता २२प्रवासी आवश्यक असतील,प्रवासात सर्वप्रवाश्यांना कोरोना विषयक नियमांचेपालन बंधनकारक करण्यात आले आहे, महत्वाचे म्हणजे प्रवाश्यांनी सोबत सँनिटायझर व तोंडाला मास्क लावणेबंधनकारकआहे प्रवासादरम्यान प्रवाश्यांनी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वत: करायची आहे. अश्या नियम व अटींचे पालन प्रवाश्यांनी काटेकोरपणे करणे बंधनकारक आहे अश्या सुचना रोहा आगारामार्फत देण्यात आल्या आहेत. तरी या मार्गावर प्रवास करणा-या प्रवाश्यांनी एसटी बसने प्रवास करुन आपला प्रवास सुखकर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment