चंदनवाडी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे २५० हेक्टर जंगल वाचले ; शॉर्टसर्किटने झाले असते खाक


चंदनवाडी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे २५० हेक्टर जंगल वाचले शॉर्टसर्किटने झाले असते खाक ; निर्सगाने दिली साथ जंगल वाचले
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यात जैवविविधतेने नटलेले ५२३६ हेक्टर वनक्षेत्र असून तालुक्यातील केलटे चंदनवाडी परिसरांत काल बुधवार दि ५ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास चंदनवाडी जवळील राखीव वनक्षेत्रात अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली.अतिशय दुर्गम भागात असलेल्या या गावातील ग्ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली स्थानिक महिला मंडळाच्या सदस्या प्रियांका गायकर,रमेश रिकामे,संतोष खेडेकर, राजेश दाभोळकर,जितेंद्र गायकर या सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ तसेच वनविभागाला संपर्क साधून घटनेचे गांभीर्य सांगितले. त्याच वेळी ग्रामस्थ सुद्धा घटनास्थळाकडे पोहोचले अन पावसातच या लागलेल्या आगीचे नियंत्रण कसे करता येईल हा विचार करेपर्यंत घटना स्थळी वनविभागाचे कर्मचारी भीमराव सूर्यतळ,अंगद भोसले आणि हरिदास बनसोडे, वीज वितरणचे इंजिनिअर अमोल पालवे, नरेश भायदे ही मंडळी सुद्धा हजर झाली. याचवेळी या परिसरात ढगफुटी सारखा मोठा पाऊस सुरु झाल्याने आग संपुर्ण आटोक्यात आली.


"चंदनवाडी केलटे परिसरात मोठया प्रमाणांत राखीव वनक्षेत्र आहे यामध्ये अनेक औषधी वनस्पती व जैवविविधतेने नटलेले अतिशय सुंदर वनवृक्ष आहेत ग्रामस्थांचे सर्तकतेमुळे जंगल वाचले वनव्यवस्थापन समितीचे हे सर्व यश आहे"
निलेश पाटील, परीक्षेत्र वन अधिकारी , म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा